Tarun Bharat

‘निपाह’चा रिपोर्ट तासाभरात हातात!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मोल्बियो डायग्नोस्टिकच्या ‘ट्रूनेट’ टेस्ट किटला ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने आपत्कालीन परवानगी दिली आहे. या टेस्ट किटद्वारे आता एका तासात निपाहच्या विषाणूची खात्री होणार आहे. निपाहची टेस्ट करणारे हे भारतातील पहिले आरटीपीसीआरवर आधारित किट आहे.

मोल्बियोचे सीईओ चंद्रशेखर नायर म्हणाले, केरळमध्ये सापडलेल्या निपाह विषाणूमुळे भारतीयांची झोप उडाली होती. निपाह विषाणूच्या तपासणीसाठी पुण्यातील लॅबला स्वॅब पाठवावा लागत होता. त्याचे रिपोर्ट यायला किमान दोन दिवस लागत होते. मात्र, आता गोव्याची कंपनी असलेल्या मोल्बियो डायग्नोस्टिकच्या टेस्ट किटला आपत्कालीन परवानगी मिळाली आहे. या टेस्ट किटद्वारे तासाभरातच निपाहचे रिझल्ट येतील. या टेस्ट किटद्वारे कोरोना, डेंग्यू, टीबी, चिकनगुनिया, हिपॅटायटीस यासारख्या 30 रोगांची तपासणी केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.

Related Stories

धर्मांतरांमुळे सामाजिक ताणतणावांमध्ये वाढ

Patil_p

लसीकरणाची वयोमर्यादा काढून टाकण्याची मागणी

Patil_p

तेजप्रताप यादवांना स्वप्नांमध्ये दिसते भूत

Patil_p

भारताचा GDP आणखी घसरणार

datta jadhav

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 35 लाखाचा टप्पा

datta jadhav

जीएसटी परिषदेच्या 46 व्या बैठकीला सुरूवात

datta jadhav