Tarun Bharat

नियंत्रण रेषेवरील तैनात जवानांना मिळणार अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने जवानांना आधुनिक आणि घातक अशा अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Advertisements

सॉअर असॉल्ट रायफल्ससाठी भारताने अमेरिकेसोबत करार केला आहे. फास्ट ट्रॅक खरेदी कार्यक्रमांतर्गत भारताने या रायफल्स खरेदी केल्या होत्या. त्यामधील 72 हजार रायफल्स भारतात आल्या असून, त्या लष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या आहेत. 

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांसाठी 1.50 लाख सिग सॉअर असॉल्ट रायफल्सचा वापर करण्यात येईल. इतर सुरक्षा दलांना एके-207 रायफल्स देण्यात येतील. पूर्व लडाखमधील सीमारेषेवरून मागील पाच महिन्यांपासून भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांचे जवान एकमेकांसमोर उभे ठाकले असून, दोन्ही देशांनी युद्धसज्जता ठेवली आहे. 

Related Stories

4.4 रिश्टर स्केलचा गुजरातमध्ये भूकंप

Patil_p

पंजाबमध्ये कडक निर्बंध : नाईट कर्फ्यूची वेळ एका तासाने वाढवली!

Rohan_P

नारदा केस : दोन मंत्र्यांसह टीएमसीच्या चार नेत्यांना अटक; नाराज ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात

Rohan_P

रमण सिंग यांच्या सचिवास अटक

Patil_p

सोपोरमध्ये ग्रेनेड हल्ला; 2 पोलीस जखमी

datta jadhav

भारतातील कोरोनाबळींची संख्या 90 हजारांवर

datta jadhav
error: Content is protected !!