Tarun Bharat

नियंत्रण रेषेवर आढळली ड्रोनसदृश्य वस्तू

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या पूछ जिल्ह्यातील मेंधर येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ड्रोनसदृश्य वस्तू हवेत उडताना आढळली. हेरगिरीच्या उद्देशाने ही वस्तू सीमारेषेवर पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. 

मेंधर येथे भारतीय भूभागावरील आकाशात ही ड्रोनसदृश्य वस्तू  घिरट्या घालत असल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. तात्काळ याची माहिती तपास यंत्रणांना देण्यात आली. पाकिस्तानकडून दिवसेंदिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भारतीय सुरक्षा दल सतर्क झाले आहे. 

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी रोजौरीतील नौशेरामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. या गोळीबारात एक जवान शहीद झाला.

Related Stories

अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात ; बाबा रामदेव यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

Archana Banage

अग्नीवीरांना मर्चंट नेव्हीत संधी…

Nilkanth Sonar

कसबा आरळे येथील अनिल पाटील या युवकाची आत्महत्या

Archana Banage

रतन टाटांनी पुन्हा जिंकली भारतीयांची मने

Patil_p

‘मोफत रेशन योजना’ गरिबांसाठी वरदान

Patil_p

भाजपचा 43 वा स्थापना दिन देशभरात साजरा

Patil_p
error: Content is protected !!