Tarun Bharat

नियमबाहय़ वाहनधारकांवर पोलिसांच्या कारवाईचे सत्र सुरूच

Advertisements

बेळगाव :/ प्रतिनिधी

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर शुक्रवारी रहदारी पोलिसांनी नियमबाहय़ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. गेल्या महिन्याभरापासून नियम मोडणाऱया वाहनधारकांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची अडवणूक करुन कागदपत्रांची चौकशी केली जात आहे. वाहनासोबत स्वतःजवळ कागदपत्रे न ठेवणाऱया व विणाहेल्मेट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोना काळात काही काळ बंद असलेला धडाका पुन्हा पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे नियमबाहय़ा वाहतुकीला चांगलाज चाप बसला आहे. त्याबरोबर  वाहनधारकांना कागदपत्रे व हेल्मेट घालूनच वाहने चालविणे गरजेचे आहे. नियम मोडून वाहने चालविणाऱया वाहनधारकांची सातत्याने अडवणूक करुन तपासणी केली जात असल्याने पोलिसांच्या या कारवाईबद्दल अनेकांतून समाधान क्यक्त होत आहे.

उत्साही तरुणाई ट्रिबल सीट, अति जलदगतीने वाहने चालविणे, रस्त्यावर स्टंटबाजी करणे आदी प्रकारणा आळा बसला आहे. त्याबरोबर विणाहेल्मेट वाहने चालविणाऱयांवर रहदारी पोलीस नजर ठेवून आहेत. त्यामुळे हेल्मेट वापरणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघाती धोका कमी झाला आहे. शहराच्या प्रवेशव्दाराजवळ म्हणजे अरगन तलावनजीक पोलिसांची कारवाई सुरू असल्याने शहरात येणाऱया वाहनधारकांनी स्वतःजवळ सर्व कागदपत्रे ठेवणे व हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. याबरोबरच चारचाकी मालवाहू वाहनांची अडवणूक करून संबंधित कागदपत्राची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी असेच कायम कारवाईचे सत्र सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेचे यश

Amit Kulkarni

मंगलमय वातावरणात तुळसी विवाहाला प्रारंभ

mithun mane

बांधकाम परवानगीचे अर्ज अडकले महसूल विभागात

Omkar B

शहरात तृतिय पंथियांचे पहिले फूड कार्ट

Amit Kulkarni

बसस्थानकात आसनांअभावी प्रवाशांची गैरसोय

Amit Kulkarni

समादेवी मंदिरातील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!