Tarun Bharat

नियमांचा भंग करत दांडीया तीन ठिकाणी कारवाई

प्रतिनिधी / कोल्हापूर

नवरात्रौत्सव काळात दांडिया खेळण्यास मनाई असतानाही शहरात रात्री उशिरापर्यंत दांडिया सुरु असलेल्या तीन ठिकाणी जुना राजवाडा पोलीसांनी कारावाई केली. बुवा चौक, खंडोबा तालीम शिवाजी पेठ, कॉलनी बॉईज देवकर पाणंद येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 17 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने गरबा, दांडिया अशा कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. प्रशासनाच्या या सूचनेकडे दूर्लक्ष करत बेकायदेशीररित्या सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत वाद्य लावून रात्री अशिरा पर्यंत दांडीया खेळत आदेशाचा भंग केल्याबाबत शहरातील बुवा चौक येथील कारवाईमध्ये ओंकार भोजे, सौरभ घरपणकर, रितेश राजवाडे, दिग्विजय साळोखे, विश्वजीत करंबे, समर्थ नवाळे, चेतन साळोखे यांच्यावर खंडोबा तालीम येथील तनवीर मोमीन, श्रवण गावडे, योगेश चौगले, किरण भालकर, विशाल चौगले आदींसह अन्य दहा ते बारा जणांवर तसेच कॉलनी बॉईज ग्रुप, देवकर पाणंद येथील किरण नलवडे, इम्रान मेस्त्री, अमीन मेस्त्री, तेजस माने, सार्थक पाटील यांच्यासह अन्य दहा ते बारा कार्यकर्त्यांवर सुनील पाटील सहाय्यक पोलीस फौजदार आणि पोलीस कॉन्सटेबल नितीन पोवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Stories

कबनूर ग्रामपंचायत कामगारांचे आंदोलन मागे

Archana Banage

इचलकरंजीत लवकरच अवतणार दूधगंगा

Kalyani Amanagi

गोडसाखरसाठी ११ वाजेपर्यंत १५.४१ टक्के मतदान

Kalyani Amanagi

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 6 मृत्यू, सक्रीय रूग्णांमध्ये घट

Archana Banage

काळम्मावाडी धरणातून ३६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Archana Banage

‘त्या’ वक्तव्याच्या निषेधार्थ कुरुंदवाडमध्ये शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Archana Banage