बंगळूर / प्रतिनिधी
बंगळूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाटाने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. जर कोरोना काळात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा बंगळूर शहर पोलिस आयुक्त भास्कर राव यांनी शनिवारी शहरातील सर्व दुकाने, मॉल्स, बँका, हॉटेल, कार्यालये व इतर आस्थापनांना दिला.
सेच कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असताना तुम्ही काय काळजी घ्यावी याची खबरदारी तुमच्या सर्वांना आहेच. आपण नियमांचे पालन करून मास्क न घातल्यास आणि सुरक्षित अंतर निश्चित न केल्यास सिटी पोलिस छापा टाकून कायदेशीर कारवाई करतील. अशी कारवाई आधीच सुरू झाले आहे, असे ते म्हणले.
याआधी शुक्रवारी डीसीपी (उत्तर) शशी कुमार यांनी त्यांच्या हद्दीतील शहरातील दुकाने व आस्थापनांवर छापा टाकला होता. नियमांचे योग्य प्रकारे पालन करणाऱ्यांना गुलाब भेट दिली. तर नियमांचे पालन न करता ज्यांनी आपली दुकाने सुरु ठेवली आहेत अशी सर्व दुकाने कारवाई करत बंद केली.

