Tarun Bharat

नियमांचे काटेकोर पालन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

Advertisements

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करा : गोविंद कारजोळ

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करा, जिल्हय़ाला आता ऑक्सिजन पुरवठय़ामध्ये वाढ करण्यात आली आहे. 16 के.एल.वरून 24 के.एल.पर्यंत यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तेव्हा रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करा. याचबरोबर कोरोनावरील रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा तातडीने करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरत असलेली रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र सरकारने कर्नाटकाला द्यावीत, अशी मागणी केंद्रीय मंत्री सदानंदगौडा यांच्याकडे करण्यात आली आहे. याचबरोबर बेळगाव जिल्हय़ामध्ये 4 ऑक्सिजन युनिट सुरू करण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे सांगितले आहे.

कोरोना रुग्णांना सर्व ती मदत करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. आरोग्य विभागानेही कोणत्याही प्रकारे हयगय न करता रुग्णांवर उपचार करावेत, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला असून केंद्र सरकार लवकरच तातडीची मदत करेल, असे त्यांनी सांगितले. खराब झालेले ऑक्सिजन युनिट लवकर दुरुस्त करावेत आणि टँकरही दुरुस्त करावेत, असे सांगून कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू देऊ नका, असे त्यांनी अधिकाऱयांना सांगितले.

जनतेनेही कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. कारण मनात आणले तर जनताच हा कोरोना थांबवू शकते. केवळ नियम पाळले तर निश्चितच कोरोना कमी होऊ शकतो. तेव्हा सर्वांनी काळजीपूर्वक नियमांचे पालन करावे आणि स्वतःच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

कचरावाहू वाहनांसाठी ता.पं.मध्ये गर्दी

Amit Kulkarni

कर्नाटक राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर

Rohan_P

अपहरण प्रकरणातील त्रिकुटाची कारागृहात रवानगी

Amit Kulkarni

श्रेया टी 20 चषक हुबळी-धारवाड लिजेंड संघाकडे

Amit Kulkarni

हुदली येथे विषबाधेने माय-लेकाचा मृत्यू

Amit Kulkarni

बेळगावच्या श्रेया बी. पोटे वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धेत सामनावीर

Patil_p
error: Content is protected !!