Tarun Bharat

नियमाचे उल्लंघन करणाऱया वाहनधारकांवर कारवाई

प्रतिनिधी  / बेळगाव

शहरात व शहराबाहेर रस्त्यांवर नियमाचे उल्लंघन करणाऱया वाहनधारकांवर   दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच आहे. शनिवारी सकाळी बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर अरगन तलावानजीक रहदारी पोलिसांनी विनाहेल्मेट वाहने चालवणाऱया व आवश्यक कागदपत्रे स्वतःजवळ न ठेवलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली.

शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी व वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे. शहरात हेल्मेटसक्ती बंधनकारक असूनदेखील वाहनधारक नियम धाब्यावर बसून विनाहेल्मेट वाहने चालवताना दिसत आहेत.  नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुरक्षित रस्ते वाहतूक होण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

  चार चाकी वाहनचालकांची अडवणूक करून कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. वाहनासंबंधी कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.  शहराबरोबर शहराबाहेरील ठिकठिकाणी रस्त्यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा सुरू आहे. सुरक्षित प्रवासाच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापरणे, नियमांचे पालन करणे, वाहनांशी संबंधित कागदपत्रे स्वतःजवळ ठेवणे बंधनकारक आहे.

Related Stories

खानापूर तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अडचणीत

Patil_p

नवीन बीपीएल रेशनकार्ड वितरणाचे काम ठप्प

Amit Kulkarni

कोल्हापूरच्या सिकंदरचा प्रवीणकुमारवर लाटणे डावावर विजय

Omkar B

बारावी रिपीटर विद्यार्थी पास…

Tousif Mujawar

सावगावात धुलिवंदनानिमित्त भव्य कुस्ती मैदान मंगळवारी

Amit Kulkarni

भिंत अंगावर पडून मेंढपाळ मामा-भाच्याचा मृत्यू

Tousif Mujawar