Tarun Bharat

नियमित अन् वाढीव वेतन द्या

कोरोनाकाळात आरोग्याची सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोनाकाळात जनतेच्या आरोग्य सेवेसाठी डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मसी, लॅब टेक्निशियन, ग्रुप डी कर्मचारी, संगणक साहाय्यक आदींची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी वाढविण्यात आला होता. मात्र, नियमित आणि वेळेत वेतन दिले जात नसल्यामुळे कुटुंबीयांची परवड होत आहे. त्यामुळे सर्व सुविधा पुरवून नियमित आणि वाढीव वेतन मिळावे, अशी मागणी कोविडकाळात तात्पुरती नेमणूक केलेल्या कर्मचाऱयांनी मंगळवारी आंदोलन छेडून केली.

कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय भवन, जनरल हॉस्पिटल, तालुका आरोग्य केंद्र यासह टोलनाका व इतर ठिकाणी नर्स, फार्मसी, लॅब टेक्निशियन आदींनी सेवा बजावली आहे. मात्र, त्यांना वेळेत आणि वाढीव वेतन देण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शासनाकडून केवळ तुटपुंजे वेतन दिले जात आहे. त्यामुळे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. अशा कर्मचाऱयांना वेळेत वेतन देण्याबरोबरच ईएसआय, पीएफ आणि सुरक्षितता द्यावी, अशी मागणीही कोरोनाकाळात आरोग्याची सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Related Stories

काळादिन ‘मेसेज’ खटला लांबणीवर

Amit Kulkarni

खानापूर बेळगाव राष्ट्रीय मार्गावरही आता नाकेबंदी

Tousif Mujawar

संचारबंदीमुळे कारखान्यांना करावा लागणार शिफ्टच्या वेळेत बदल

Patil_p

खानापूर तालुक्यात युरिया खताची टंचाई

Amit Kulkarni

कोल्हापुरात आज सीमाबांधवांची वज्रमूठ

Amit Kulkarni

बेळवट्टी येथे ट्रक अपघातात युवक ठार

Amit Kulkarni