Tarun Bharat

नियमित कर्जदारासाठी स्वाभिमानीचा एल्गार


वसगडे / वार्ताहर

राज्य शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळावा. स्वाभिमानी शेतकरी ची लढाई आता नियमित कर्ज धारक शेतकऱ्यांच्या साठी असुन राज्य शासनाने जाहीर केलेले पन्नास हजार रूपया चे प्रोत्साहन अनुदान व दाेन लाखा वरील थकीत कर्जधारकांचे कर्ज त्वरित माफ करावी असे प्रतिपादन संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केले.
दुधगाव ता.मिरज येथे याबाबत पार पडलेल्या पहिली बैठक पार पडली या प्रसंगी ते बाेलत हाेते.

पुढे राजोबा म्हणाले राज्यशासनाने सतेत येण्यापूर्वी दिलेला शब्द पाळावा, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याचा तर त्यांना विसर पडला आहे. पण स्वतःहुन जाहीर केलेले प्रोत्साहन पर अनुदान व दाेन लाखावरील थकीत कर्ज धारकांचा निर्णय ही अजून झाला नाही. हिवाळी अधिवेशनात काहीतरी निर्णय होणे अपेक्षित होते पण या सरकारने पुन्हा एकदा या शेतकर्‍यांच्या तोंडाला आश्वासनाची पाने पुसली आहेत. सरकार, विरोधी पक्षाला जनतेच्या प्रश्नांपेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यातच बर वाटत असल्याचा आराेप राजाेबांनी केला आहे.

शेतकऱ्यांची पोर आमदार म्हणून सत्तेत आहेत त्यांनी देखील यावर एक शब्द उच्चरला नाही. तसेच शेतकऱ्यांचे शेती पंपांचे व घरगुती वीज बिल त्वरित माफ करावे व ऊस हंगाम चालू होऊन दीड महिना होऊन गेला अजूनही सोनहिरा कारखाना वगळून कुठल्याही कारखान्यानी एक रकमी एफआरपी जमा केली नाही तरी ती त्वरित द्यावी. जो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा सुरु राहणार आहे. माजी खा.राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. तद्नंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा राजाेबांनी दिला आहे.
सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे बाेलताना म्हणाले केंद्र सरकारने जे तीन कायदे केलव आहेत ते शेतकऱ्यांचे विरोधात आहेत. भविष्यात त्यांचे दुष्परिणाम हाेणार असुन हे कायदे तात्काळ रद्द करावेत अशी मागणी केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वा.यु.आ.जिल्हाध्यक्ष संजय बेले, जि. प.सदस्य सुरेखा आडमुठे,आबासाहेब शिंदे, नामदेवराव होमकर,बाबा सांद्रे,भरत साजने,मारुती देवकर,शीतल सांद्रे.. संदीप आडमुठे, शरद आष्टेकर, स्वप्नील पाटील, वैभव कोले,अमोल कोले,अनिल कोले,सुनिल कुदळे, हेमंत कोले व माेठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

दुचाकीच्या भीषण धडकेत तीन ठार; दोन गंभीर

Kalyani Amanagi

कृष्णा अभिमत विद्यापीठाचा आज दहावा दीक्षांत सोहळा

Patil_p

सांगली मनपा क्षेत्रातील ३० विहिरींची स्वच्छता

Abhijeet Khandekar

बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना- भाजपचे सरकार स्थापन- मुख्यमंत्री

Abhijeet Khandekar

रायगडच्या पालकमंत्री कुंभरोशीत पोहचल्या

Patil_p

कुंभोजमधील लॅब टेक्नीशियन पॉझिटिव्ह

Archana Banage