Tarun Bharat

नियम धाब्यावर बसवून पार्ट्या करणाऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई/प्रतिनिधी

सरत्या २०२१ या वर्षाला निरोप देत नव वर्षाच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरु झाली आहे. पण पार्टी करणाऱ्यांनो सावधान. देशात कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. तसे आदेशही दिले आहेत.

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पार्टीचे आयोजन करुन नये असे आवाहन राज्य सरकारकडून केले जातेय. तर दुसरीकडे कोरोनाविरोधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणावे की, ज्यांना पार्टी करायची आहे त्यांच्यासाठी पूर्ण वर्ष आहे. मात्र सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेत कुटुंबियांसोबत नव्या वर्षाचे स्वागत करा. पोलिसांना सूचना दिल्या असून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच येणार आहे. त्यामुळे कारवाई करण्यापेक्षा लोकांनी कोरोनाचे नियम पाळा, गर्दी करु नका, असे आवाहन गृहमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.

Related Stories

इतिहासप्रेमी नागरिकांच्या सतर्कतेने वाचला हजार वर्षांपूर्वीचा शिलालेख

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : 20 लाखांची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकार जाळ्यात

Archana Banage

राज्यात थंडी कमी; उकाडा कायम

datta jadhav

राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

महाराष्ट्र शासनाची कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची विनंती

Archana Banage

शिरोळ तालुक्यामध्ये दिवसभरात ४४ कोरोनाबाधित

Archana Banage