Tarun Bharat

निराधारांना आधार देणारी जीवनआनंद

Advertisements

‘मॉ आसरोघर’रूपात गोमंतकीयांच्या सेवेत

प्रतिनिधी/ फोंडा

निराधारांना आधार देणाच्या संकल्पनेतून वावरणाऱया कुडाळ-महाराष्ट्रस्थित जीवन आनंद संस्थेतर्फे नुकतेच ओपा खांडेपार येथे सेव़ाश्रम सुरू करण्यात आला. गोमंतकीयाच्या सेवेत ‘मॉ आसरोघर’ च्या माध्यमातून शुभारंभ करताना काल शुक्रवार  18 जून क्रांतीदिनी सदर सेवाकेंद्राचे उद्घाटन फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास कुवेलकर यांच्याहस्ते करण्यात आले. 

  यावेळी कुर्टी खांडेपार पंचायतीचे सरपंच सुनिल खेडेकर, पंचसदस्य सांतान फर्नांडिस, संदीप खांडेपारकर, अनंत खेडेकर, बीएनआय ग्रुपचे अगरवाल, ज्येष्ठ कलाकार श्रीधर कामत बांबोळकर, पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप, राजीव पंडीत, जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब व इतर मान्यवर उपस्थित होते.

   यावेळी बोलताना डॉ. विकास कुवेलकर म्हणाले, निराधारांना आधार ही देवतुल्य   संकल्पना आहे. आजच्या कोरोना महामारीच्या काळात आपल्यासह दुसऱयाची काळजी घेणे ही प्राथमिकता झालेली आहे. त्यामुळे निराधारांना आधर देताना अशा अनोळखी माणसांची प्रथम कोरोना चाचणी तसेच इतर संसर्गजन्य रोगाचे निदान करणे अंत्यत आवश्यक आहे. त्यासाठी फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे दरवाजे यासाठी सदैव खुले असल्याचे डॉ. कुवेलकर म्हणाले. यावेळी सेवाकेंद्रात ठेवलेल्या निराधारांना मान्यवरांनी कोरोना किट व इतर सामुग्री प्रदान करण्यात आली. निसर्गरम्य वातावरणात सदर सेवाकेंद्रासाठी राजीव पंडित कुटुंबियांनी आपले घर वापरण्यासाठी दिलेले आहे. तसेच इतर सोयीसुविधा बीएनआय समुद्र ग्रुपतर्फे अगरवाल यांनी पुरविल्या आहेत. याकामी अभिजीत सावंत व टीमने महत्वाचे मदतकार्य पेलेले आहे. मायबोली सारख्या इतर अनेक संस्थाचे योगदानही याकामी महत्वाचे असल्याचे परब यांनी सांगितले. सोहळय़ाची सुरुवात साने गुरूजी यांच्या खरा तो एकची धर्म… जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेने झाली. या सामाजिक उपक्रमासंबंधी राज्यातील कोमुनिदाद जागेचा उपयोग व्हावा असे सरपंच सुनिल खेडेकर म्हणाले. पंचसदस्य संदीप खांडेपारकर यांनीही विचार मांडले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पूनम भुर्ये यांनी केले. अभिजीत सावंत यांनी आभार व्यक्त केले.  

‘मॉ आसरोघर’ निराधार बांधवाच्या पुनर्वसानाची क्रांती

अपघातात सापडलेले निराधार, मनोरूग्ण, रस्त्यावरील दुलक्षित माणसांसाठी गोव्यात सेवा देण्याच्या हेतूने पहिली शाखा ओपा खांडेपारच्या निसर्गरम्य परिसरात सुरू केलेली आहे. गोव्यात ही पहिली शाखा असून मॉ आसराघर असे त्याचे नामकरण करण्यात आलेले आहे. जीवन आनंद संस्थेच्या महाराष्ट्रात पाच शाखा आहेत.  पंडूर-कुडाळ येथील संविता आश्रम, अणव कुडाळ येथील कै. सुप्रियाताई वेगुर्लेकर रीहेबिलेशन सेंटर, विरार मुंबई येथील समर्थ आश्रम, सांताप्रुझ मुंबई येथील कार्वर डे-नाईट शल्टर, दहीसुर मुंबई येथील संगम प्रकल्प आहे. सदर संस्थेला दात्यांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक संदीप परब यांनी केले आहे. निराधारांना आधार व इतर मदतकार्यासाठी तसेच संस्थेला कडधान्य, अर्थसहाय्य, वापरलेले कपडे, निराधारांसाठी सेवा देऊ इच्छिणाऱयांनी संस्थेचे व्यवस्थापक प्रसाद आंगणे 9834534869 यांच्यांशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. 

निराधारांचे जीवनआनंद फुलविणारा संदीप परब    संदीप परब यांनी मुंबईमध्ये 1999 पासून निराधारांना मदत करण्याची सेवा सुरू केलेली आहे. लोकांच्या आनंदात आपले सुख मानणारा संदीप परब यांनी स्वतः गोव्यातील म्हापसा येथे रस्त्यावर बसणाऱया निराधारांसमवेत रात्र दिवस बसून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. तेथूनच दिमतीला माणसे जोडत त्यांनी गोव्यातील निराधार, मनोरूग्ण, अपघातात सापडलेले निराधार, वृद्धांना सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. धार्मिक व जातीय भेदभाव व्यक्तीरीत त्याची ही सेवा असून पाकिस्तान, बांगलादेश येथीलही स्मृतीभ्रष्ट झालेल्यासाठी त्यांनी सेवा दिलेली आहे. आजपर्यंत त्यांनी सहाशेहून अधिक लोकांना उपचारानंतर सुखरूप घरी रवानगी केलेली आहे. तसेच दीड हजाराहून निराधारांना आधार दिलेला आहे. मनोरूग्ण असो वा वृद्ध  तोही समाजाचा घटक असून आपलाच बांधव असे समजून तो त्याला आपल्यापरीन मदत पुरवित त्याची सेवा करतो. ही सेवा अखंडीतपणे ठेवणे हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय तो समजतो. रोटरी क्लबतर्फे आयोजित सेवा कार्यक्रमातून परब यांची अनेक व्याख्याने झालेली आहेत. 

Related Stories

चाचणीनंतर लगेचच मिळणार औषधोपचार

Amit Kulkarni

सरकारने गृह कर्ज योजना रद्द करत सरकारी कर्मचाऱयांवर अन्याय केला

Omkar B

जपानमध्ये अडकलेले 50 गोवेकर भारताकडे रवाना

tarunbharat

वास्कोत ताबडतोब पूर्ण लॉकडाऊन करावे

Omkar B

जस्पाल सिंग गोवा पोलीस खात्याचे नवे डीजीपी

Amit Kulkarni

कुंडई येथे मोबाईल हिसकावणाऱया दोघा चोरटय़ांना अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!