Tarun Bharat

निर्धारित किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास कारवाई; ..तर ‘या’ नंबरवर करा कॉल

Advertisements

सांगली / प्रतिनिधी

सांगली जिल्हयामध्ये पुरसदृश्य परिस्थिती असून सदरच्या काळामध्ये जीवनावश्यक आवेष्टीत वस्तूंची कमाल विक्री किंमतीपेक्षा (सर्व करांसहीत) जास्त दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा प्रकारे निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा ( एमआरपी ) पेक्षा जास्त दराने विक्री करत असलेल्या कुठल्याही आस्थापना, दुकाने आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे वैध मापनशास्त्र उपनियंत्रक श्रीम. जे. एस. पाटील यांनी कळविले आहे.

निर्धारीत केलेल्या किंमतीपेक्षा ( एमआरपी ) पेक्षा जास्त दराने विक्री करत असलेल्या कुठल्याही आस्थापना/दुकान आढळल्यास पुढील दूरध्वनी, भ्रमणध्वनीवर संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन वैध मापनशास्त्र उपनियंत्रक श्रीमती. जे. एस. पाटील यांनी केले आहे. अशा कारवाईसाठी नियुक्त केलेले अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र ०२३३-२६०००५३ (उपनियंत्रक वैध मापनशास्त्र कार्यालय, सांगली ), निरीक्षक वाय.एस. अग्रवाल ७७७५०७७७८७ (सांगली-०१विभाग), निरीक्षक एम.आर.जोशी ९३५९२२३७७४ (सांगली-०२ विभाग), निरीक्षक श्री. एस.डी. मनसुटे ९८९०५५१३०८ (मिरज विभाग)  निरीक्षक श्री. एस. ए. अकोळकर ९४२३०४२४८७ ( तासगांव विभाग), निरीक्षक श्री. एम. आर. कांबळे ९८२२१०९१२६ (जत विभाग), निरीक्षक  एम.आर. जोशी ९३५९२२३७७४ ( विटा विभाग ), निरीक्षक वाय.एस. अग्रवाल ७७७५०७७७८७ ( इस्लामपूर विभाग )

Related Stories

सांगली जिल्ह्यात नवे 21 रूग्ण तर 35 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सांगली : राजेवाडी येथील ग्रामसेवकास जीवे मारण्याची धमकी

Abhijeet Shinde

सांगली : ‘व्यंकटेश टेक्सटाईल’वर छापा: मालकाकड़ून अधिकाऱ्यांना मारहाण

Abhijeet Shinde

बजरंग गावडे यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

सांगली : दरीबडचीतील ‘त्या’ तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट, तिघे ताब्यात

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे 683 नवे रुग्ण, 413 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!