Tarun Bharat

निर्बंध हटवल्याने सोने आयातीत वाढ

एप्रिल-जून तिमाहीत 97 टनाची आयात- खरेदीवर ग्राहकांचा भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशभरातील कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्यावर अनेक राज्यांनी मागच्या म्हणजेच जूनमध्ये निर्बंध शिथिल केल्याने सोने आयातीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. एप्रिल ते जून कालावधीत 97 टन इतक्या सोन्याची आयात झाली आहे.

मागच्या वर्षातील तिमाहीपेक्षा हे प्रमाण अर्धे असल्याचे दिसून आले आहे. विदेशातून मागच्या महिन्यात 15 टन सोने भारतात दाखल झाले आहे, जे मागच्या वर्षी 13.2 टन इतके होते. ब्लूमबर्गने यासंबंधीची माहिती दिली आहे. भारत हा जागतिक स्तरावर दुसऱया नंबरचा सोने वापरणारा देश आहे. कोरोना महामारीने मे महिन्यामध्ये भारतात मोठी हानी केली आहे. रुग्णसंख्या 4 लाखांवर पोहचल्याने अनेकांना हॉस्पिटलच्या वाऱया कराव्या लागल्या होत्या व अनेक आप्तांना गमवावे लागले होते. जूनमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर लॉकडाऊनसंबंधीचे निर्बंध अनेक राज्यांनी हटवले. हे पाहून अनेक सराफी व्यावसायिकांनी आपले व्यवसाय पुन्हा सुरू केले. किंमती कमी झाल्याचे कारण पाहून अनेकांनी सोने खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली.

Related Stories

ट्रायचे ब्रॉडबँड स्पीड वाढविण्याचे ध्येय

Patil_p

स्टरलाइट पॉवरचा आयपीओसाठी प्रस्ताव

Amit Kulkarni

2020-21 मध्ये जीडीपी 5.1 टक्क्यांवर : फिच

tarunbharat

एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या सीईओपदी नवनीत मुनोत

Patil_p

स्पाइसजेटचा तोटा वाढला

Patil_p

युको बँकेचा समभाग 8 टक्के तेजीत

Patil_p