Tarun Bharat

निर्भया : चारही दोषींना होणार एकत्रच फाशी!

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

निर्भया प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी करणाऱया केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी केली.

यामध्ये चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला दिल्लीतील सत्र न्यायालयाने दिलेल्या स्थगितीविरोधात तेथील उच्च न्यायालयात केंद्र सरकारने दाखल केलेली याचिका बुधवारी फेटाळण्यात आली.

त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील न्या. सुरेशकुमार कैत यांनी सुनावणीवेळी हे आदेश दिले. सर्व दोषींना एकाचवेळी फाशी दिली जावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

 

Related Stories

पश्चिम बंगालमधील बलात्कार पिडितांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Patil_p

व्यापारी संघटनांचा आज ‘भारत बंद’

Amit Kulkarni

आमदार निलंबन प्रकरणी महाराष्ट्र सरकारला नोटीस

Patil_p

केंद्र सरकार रेमडेसिविरचा पुरवठा थांबवणार

Abhijeet Shinde

राज्यात पुन्हा 12 नवे रुग्ण

Patil_p

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण कार्यक्रम सरकारने पुढे ढकलला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!