Tarun Bharat

निर्भया : दोषी मुकेशच्या याचिकेवर होणार तत्काळ सुनावणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंह याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तत्काळ सुनावणी घेण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारीला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार असेल, तर याचिकेवर प्राथमिकतेने सुनावणी आवश्यक आहे, असे मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने व्यक्त केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर मुकेशने सुप्रीम कोर्टात धाव घेत राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान दिले होते. याचिकेवर तत्काळ सुनावणीची मागणी त्याने वकिलामार्फत सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे केली होती.

दरम्यान, शनिवारी मुकेशच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी न्यायालयात धाव घेत राष्ट्रपतींच्या निर्णयावर न्यायालयीन समीक्षेची मागणी केली होती. संविधनातील अनुच्छेद 32 अंतर्गत याचिका दाखल करण्यात आली असून, शत्रुघ्न चौहान प्रकरणात देण्यात आलेल्या निर्णयाचा दाखला याचिकेसोबत देण्यात आला आहे.

 

 

 

Related Stories

शनिवारी उच्चांकी 3,860 जण कोरोनामुक्त

Patil_p

पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंत घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Abhijeet Khandekar

गर्दी रोखा, संसर्ग टाळा!

Patil_p

उष्णतेच्या लाटेत वीजसंकटही तीव्र

Patil_p

राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला उद्धव ठाकरेंचं उत्तर

Archana Banage

दिल्लीत दिवसभरात 2,920 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar
error: Content is protected !!