Tarun Bharat

निर्भया : पुढची सुनावणी 11 फेब्रुवारी रोजी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना देण्यात आलेल्या फाशीची तातडीने अंमबजावणी करण्यासंदर्भात केंद्र आणि दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आता पुढील आठवडय़ात मंगळवारी (11 फेब्रुवारी) सुनावणी होईल. 

याआधी केंद्र सरकारने मुकेश, विनय आणि अक्षय यांना फाशी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता मंगळवारी दोन वाजता यावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी करावे, अशी मागणी केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी केली. दोषींकडून केवळ शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या प्रकरणात चारही दोषींना एक फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती. पण आदल्या दिवशी दिल्लीतील न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली.

 

Related Stories

एका संशयिताला अटक, तिघांवर नजर

Patil_p

आधार, शादी, डब्बा ऑक्सफर्ड डिक्शनरीत

Patil_p

भारतीय सीमेवर तैनात, चिनी सैनिकाला रडू आवरेना

Patil_p

NIA कडून पुन्हा PFI च्या २५ ठिकाणी छापेमारी, आठवड्याभरातील दुसरी मोठी कारवाई

Archana Banage

ऊर्जा क्षेत्राच्या सामर्थ्याची घोषणा

Patil_p

१५ वर्षापेक्षा जुनी असलेली वाहने आता भंगारात निघणार; मंत्री गडकरींची घोषणा

Archana Banage