Tarun Bharat

निर्भया : मुकेशची याचिका फेटाळली; फाशी निश्चित

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंहची याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली. त्यामुळे मुकेशची फाशीची शिक्षा आता सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केली आहे.

मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात शेवटचा पर्याय म्हणून धाव घेतली होती. मात्र, तो पर्याय फोल ठरला आहे. निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात एकूण चार आरोपी आहेत. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मुकेश याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. परंतु, राष्ट्रपतींनी त्याची दया याचिका फेटाळून लावली होती.

राष्ट्रपतींकडे या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे देण्यात आली नव्हती. त्यांनी दया याचिका फेटाळण्यात घाई केली, असा दावा करत मुकेश याच्या वकील अंजना प्रकाश यांनी ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळली.

तसेच सत्र न्यायालयाने या प्रकरणातील दोषींसाठी फाशीची कोणती तारीख निश्चित केली आहे, त्यांचे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे का?, याचे उत्तर तिहार कारागृहाकडून मागितले आहे.

Related Stories

जम्मू काश्मीर : नगरोटामध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

Tousif Mujawar

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा; म्हणाले…

Tousif Mujawar

सोशल मीडियावरून भाजयुमोच्या मुंबई अध्यक्षांना जीवे ठार मारण्याची धमकी

datta jadhav

ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मात्र मोर्चे काढण्यात दंग – देवेंद्र फडणवीस

Archana Banage

“… त्या आधी भाजपशी जुळवून घ्यावं”, आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

Archana Banage

ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश?

datta jadhav