Tarun Bharat

निर्मला सीतारमण सलग तिसऱ्यांदा फोर्ब्सच्या यादीत

अन्य तीन भारतीय महिलांचा देखील समावेश

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील १०० सर्वात प्रभावी महिलांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये सलग तिसऱ्यांदा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश झाला आहे. तसेच अन्य तीन भारतीय महिलांचा देखील समावेश आहे. सीतारमण यांनी अमेरिकेच्या महिला अर्थमंत्री जेनेट येलेन यांना देखील मागे टाकलं असून थेट ३७ व्या स्थानी झेप घेतली आहे. जगभरातील १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये एकूम चार भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये निर्मला सीतारमण यांचा क्रमांक सर्वात वरचा असून त्याखालोखाल ५२, ७२ आणि ८८ अशा क्रमांकावर भारतीय महिला आहेत.

सलग तीन वर्षे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश झाले आहे. दरम्यान, २०१९ आणि २०२० या दोन वर्षी फोर्ब्सनं जाहीर केलेल्या १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारमण यांचा समावेश झाला होता. यंदा पुन्हा एकदा त्यांना या यादीमध्ये स्थान मिळालं असून त्या ३७ व्या क्रमांकावर आहेत. त्याउलट अमेरिकेच्या महिला अर्थमंत्री जेनेट येलेन या ३९ व्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी निर्मला सीतारमण या यादीमध्ये ४१व्या स्थानी होत्या.

निर्मला सीतारमण यांच्यासोबत एचसीएल टेक्नॉलॉजीच्या संचालिका रोशनी नाडर, बायोकॉनच्या कार्यकारी संचालिका किरण मुझुमदार शॉ आणि नायकाच्या सीईओ फाल्गुनी नायर यांचा देखील फोर्ब्स यादीत समावेश झाला आहे.

१०० महिलांच्या यादीत रोशनी नाडर ५२ व्या क्रमांकावर आहेत. रोशनी नाडर या नामांकित आयटी कंपनीचं प्रमुखपद सांभाळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला उद्योजिका आहेत.

रोशनी नाडर यांच्यासोबत बायोकॉनच्या कार्यकारी संचालिका किरण मुझुमदार शॉ यांचा देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुझुमदार यादीत ७२व्या स्थानी आहेत.

दरम्यान, नुकत्याच देशातील सातव्या बिलियनर ठरलेल्या नायकाच्या सीईओ फाल्गुनी नायर यांचा देखील यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्या १०० प्रभावी महिलांच्या यादीमध्ये ८८व्या स्थानी आहेत.

Related Stories

”निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही”

Archana Banage

पाक पंतप्रधानांना मनी लाँड्रींग प्रकरणात जामीन

Patil_p

‘कोर्बेवॅक्स’ लशीला बूस्टर डोससाठी परवानगी

Nilkanth Sonar

अनुकंपा तत्वावर तारतंत्री पदासाठी 569 तरुणांना देणार आयटीआयमधून प्रशिक्षण

datta jadhav

सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : राजू शेट्टी

Archana Banage

सुरीनामचे अध्यक्ष गणतंत्र दिनाचे प्रमुख अतिथी

Patil_p
error: Content is protected !!