Tarun Bharat

निर्मल ग्राम पुरस्कार यंदा मिळणार की नाही?

Advertisements

तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींमध्ये संभ्रम : कोरोनानंतर पुरस्कारासाठी प्रतीक्षा, सरकारला विसर

प्रतिनिधी / बेळगाव

केंद्र सरकारने प्रत्येक गाव विकासाभिमुख करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. यासाठी तालुका पातळीवर जोरदार प्रयत्नही करण्यात आले आहेत. यामुळे ज्या गावांनी ही कामे वेळेत पूर्ण केली आहेत त्या गावांना निर्मल ग्राम पुरस्काराने गौरविण्यात येते. मात्र कोरोना काळामध्ये हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. यावषीही सरकारला या पुरस्कारांचा विसर पडल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

बेळगाव तालुक्मयातील 21 ग्राम पंचायतींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येते तर खानापूर तालुक्मयातील 20 हून अधिक ग्राम पंचायतींची निवड करण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून या पुरस्कारांचा विसर पडला आहे. त्यामुळे अजूनही तालुका पंचायतीला अर्ज मागविण्यासाठीचे आदेश आले नाहीत. त्यामुळे यावषी हा पुरस्कार देण्यात येणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान दि. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त बेंगळूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचवेळी निर्मल ग्राम पुरस्कार व गांधी पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. आता केवळ तीन दिवसांवर 2 ऑक्टोबर आहे. मात्र याबाबत अजूनही कोणत्याच सूचना आल्या नाहीत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. दरम्यान, बेळगाव तालुका जिल्हय़ात हागणदारीमुक्तसाठी आघाडीवर आहे. बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींनी वेगवेगळी विकासकामे पूर्ण केली आहेत. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त बेंगळूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करून हे पुरस्कार वितरित करण्यात येतात. मात्र आता याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी अनेक ग्राम पंचायत अध्यक्षांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी संबंधित तालुका पंचायत अध्यक्ष, ग्राम विकास अधिकारी आणि सेपेटरी तसेच तालुका पंचायतमधील अधिकारी यांना बोलावून घेण्यात येते. मात्र यावर्षी पुरस्कार जाहीर करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे.

सरकारने घोषणा करण्याची मागणी

बेळगाव तालुक्यातून दरवषी गांधी ग्राम पुरस्कारासाठी ग्राम पंचायतींची नावे राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. मात्र त्यामधील एकाच ग्राम पंचायतीची निवड करण्यात येते. तसेच निर्मल ग्राम पुरस्कारासाठीही 20 हून अधिक गावांची निवड करण्यात येते. तालुक्मयातील विकासकामांवर भर देणाऱया ग्राम पंचायतींना अधिक प्राधान्य देण्यात येते. यावर्षे जलजीवन मिशन, उद्योग खात्री व इतर विकासकामे ज्या ग्राम पंचायतींनी मोठय़ा प्रमाणात राबविली आहेत. त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार होती. मात्र सरकारकडून कोणताच आदेश न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. परिणामी आता तरी हे पुरस्कार जाहीर करण्यासाठी सरकारने घोषणा करावी, अशी मागणी होत आहे.

सरकारलाच विसर पडल्यामुळे अनेकांतून संताप

दरवषी तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायती या पुरस्कारांसाठी आपल्या कामांचा लेखाजोखा व इतर सर्व कागदपत्रे सरकारकडे पाठवून देतात. त्यानंतर सरकारकडून ग्राम पंचायतींची निवड करण्यात येते. परिणामी याची माहिती जिल्हा पंचायत, तालुका पंचायतमार्फत ती संबंधित ग्राम पंचायतींना देण्यात येते. मात्र यावषी सरकारने कोणत्याच विकासकामांची व पुरस्कारासाठी इच्छुक असणाऱया ग्राम पंचायतींकडून माहिती मागविली नाही. त्यामुळे आता मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारलाच या पुरस्कारांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक ग्राम पंचायतीमधून नाराजी तालुक्मयात सध्या 20 हून अधिक ग्राम पंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार देण्यात येतो. यासाठी वर्षभर संबंधित ग्राम पंचायतींच्या कामांचा आढावा घेण्यात येतो. यासाठी पीडीओ, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ग्राम पंचायत कर्मचारी मोठे कष्ट घेत असतात. मात्र यावषी सरकारने अनेकांचा हिरमोड केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

Related Stories

दुसरे रेल्वे गेट येथे बसविण्यात आले नवे फाटक

Amit Kulkarni

एकजुटीचे दर्शन घडविण्याचा निर्धार

Amit Kulkarni

ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांना मोबाईलचे वेड

Amit Kulkarni

उत्पादनांचे सादरीकरण आकर्षक करा

Amit Kulkarni

बसवण कुडचीत, मच्छे येथे आंबिल गाडय़ांची मिरवणूक

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांनी केली निदर्शने

Amit Kulkarni
error: Content is protected !!