Tarun Bharat

निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी

  • पोलिसांकडून एकाला अटक
Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटीच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी आली असल्याचे समजते आहे. 


महेश मांजरेकर यांना बुधवारी खंडणीच्या धमकीचा मोबाईलवर  फोन आला. यात खंडणी मागणाऱ्याने 35 कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मांजरेकर यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनीही तातडीने पावले उचलत खंडणीखोराला लगेच अटक केली आहे. 

हा खंडणीखोर रत्नागिरीतील खेडमधला 32 वर्षांचा युवक असल्याचे कळते आहे. त्याचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती, या सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.  


महेश मांजरेकर हे नाव हिंदी-मराठी इंडस्ट्रीला प्रसिद्ध नाव असून, त्यांनी अस्तित्व, वास्तव, दबंग, वॉन्टेड, दबंग, काकस्पर्श, नटसम्राट आदी अनेक सिनेमांतून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा, अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.

Related Stories

त्यांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या, आम्ही विकासावर बोलणार- अजित पवार

Archana Banage

‘राज्यात ७ जुलैपर्यंत ६५ टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना दिली लस’

Archana Banage

‘लेडी चेटर्लीज लव्हर’वर येतोय चित्रपट

Amit Kulkarni

अभिनेते जॅकी श्रॉफ यांची सामाजिक बांधिलकी

Patil_p

बसवराज बोम्माई यांनी शपथविधीपूर्वी येडियुराप्पांची घेतली भेट

Archana Banage

तब्बल १४ वर्षांनी काडीपेट्यांची किंमतही वाढली

Archana Banage
error: Content is protected !!