Tarun Bharat

निलजीत आज भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान

वार्ताहर / सांबरा

निलजी येथे शनिवार दि. 16 रोजी दुपारी 2 वा. हेणाऱया महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या व्याख्यान कार्यक्रमासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.

कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून रामदेव गल्ली निलजीतील श्रीराम मंदिरसमोर भव्य शामियाना उभारला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आदर्श शिक्षक छत्रु पाटील राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शन प्रभुजी उपस्थित राहणार आहेत. येथील ग्रामविकास समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व युवक मंडळे, ग्रा. पं. सदस्य, देवस्थान पंच कमिटी आदी परिश्रम घेत आहेत. प्रारंभी भास्कर पेरे पाटील यांचे आगमनानंतर ते तलाव पुनरुज्जीवन कामाची पाहणी करून स्मशानभूमी विकासाची पाहणी करतील. त्यानंतर मंदिरांना भेट दिल्यानंतर ते ग्रा. पं. सदस्यांशी संवाद साधतील. दुपारी 2 वाजता प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होणार असून ‘ग्राम पंचायत व गावचा विकास’ या विषयावर ते प्रबोधनपर व्याख्यान देणार आहेत. तर सायंकाळी 7 वा. मुतगा येथील हनुमान मंदिरासमोर त्यांचा कार्यक्रम होणार आहे. तरी ग्रा. पं. सदस्य व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

Related Stories

पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय

Amit Kulkarni

राज्य ग्राहक आयोग बेळगावात तातडीने सुरू करा

Omkar B

• थर्टीफस्टला तळीरामांनी रिचवले 1 लाख 87 हजार लीटर मद्य

Patil_p

गोकाक येथे बाप-लेकाला कोरोनाची लागण

Patil_p

रेड्डी भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

Patil_p

बळ्ळारी नाल्याच्या खोदाईकामाला आताच सुरुवात करा

Amit Kulkarni