Tarun Bharat

निलेश फाळके यांची राज्यमंत्री यड्रावकर यांचे विशेष कार्य अधिकारीपदी नियुक्ती

प्रतिनिधी / सातारा : 

सातारा तालुक्यातील सासपडे येथील निलेश मधूकर फाळके यांची आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे विशेष कार्य अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे. फाळके हे सध्या आरोग्य विभाग, मुंबई येथे अवर सचिव या पदावर कार्यरत होते. कोरोना लसीकरणचा अत्यंत संवेदनशील विषय हाताळत होते. यापूर्वी फाळके यांनी महाविद्यालयीन जीवनात पत्रकार म्हणून काम केले आहे. 

लोकसेवा आयोगाद्वारे मंत्रालयात कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी गृहनिर्माण, जलसंपदा व आरोग्य विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवला. यापूर्वी त्यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंपदा मंत्री तानाजीराव सावंत, सध्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या आस्थापनेवर विशेष कार्य अधिकारी या पदावर काम केले आहे. त्यांच्या या नियुक्तीबाबत सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.  

Related Stories

सातारा : साईबाबा चौकातील अतिक्रमण हटवले

datta jadhav

जिल्हय़ात भूकंपाचा सौम्य धक्का

Patil_p

सातारा : राजवाडा-नगरपालिका रस्त्याचे डांबरीकरण

datta jadhav

भुविकास बँक ते तहसीलदार कार्यालयादरम्यान हॉकर्सधारकांची कोरोना टेस्ट

Patil_p

Satara : सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांना मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

साताऱ्यात आज ७ नागरिकांना डिस्चार्ज तर १२६ नमुने पाठवले तपासणीला

Archana Banage