- कोरोनामुक्त बिग बींचे केबीसी सेटवर कमबॅक !
ऑनलाईन टीम / मुंबई :
काही दिवसांपूर्वी कोरोनाला मात देऊन घरी परतलेले बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतः स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. बिग बी ‘कौन बनेगा करोडपति 12’ च्या सेटवर परतले असून त्यांनी शुटींगला सुरुवात केली आहे.


अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर आता आपल्या कामाला पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली आहे. बिग बी यांनी आज सेटवर शुटींग दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘कौन बनेगा करोड़पति 12’च्या सेटवरील सर्व लोक पीपीई किटमध्ये दिसून येत आहेत. तसेच अमिताभ बच्चन यांनी केबीसीची 20 वर्ष शानदार असल्याचे सांगितले आहे.


इंस्टाग्राम वरील पोस्टमध्ये बिग बी म्हणाले की, कामावर पुन्हा परतलो आहे. निळ्या पीपीई किटच्या समुद्रामध्ये… केबीसी 12… 2000 पासून सुरु झाले होते… आज साल 2020 मध्ये 20 वर्ष पूर्ण होत आहेत.’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.