भारतातील जयपूर हे शहर गुलाबी रंगाने मोहून टाकणारे आहे. मोरक्कोमध्येही असेच एक शहर आहे, जे निळय़ा रंगाच्या जादूने स्वतःकडे आकर्षित करते. या शहराला कोबाल्ट ब्ल्यू सिटी या नावाने ओळखले जाते पण याचे खरे नाव शेफशवन आहे. हे शहर रिफच्या खोऱयांमध्ये वसलेले आहे.
या सुंदर निळय़ा रंगातील शेफशवन शहराची अदाच निराळी आहे. येथील घरे, भिंती आणि खिडक्यांपासून रस्ते देखील निळय़ा रंगात रंगलेले आहेत. या शहराचा पाया 1471 मध्ये रचण्यात आला होता. याला मोरक्कोच्या सर्वात पवित्र शहरांपैकी एक मानले जाते.
येथील लोक निळय़ा रंगाला पावित्र्याचे प्रतीक मानतात. याचमुळे पूर्ण शहर निळय़ा रंगात न्हाऊन निघालेले आहे. येथील प्रत्येक गोष्टीत याच रंगाचे कॉम्बिनेशन आढळून येईल. हे शहर पवित्र असल्याने येथे पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी आहे.


निळय़ा रंगापासून डास दूर राहतात असे काही लोकांचे मानणे आहे. तर या रंगाचा वापर शहराला एकरुप आणि सुंदर करण्यासाठी करण्यात आल्याची काही लोकांची धारणा आहे. या शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
हे शहर अन् पवित्र असले तरीही ते आता अमली पदार्थांचा अड्डा ठरले आहे. मोरक्कोमधील याच एकमात्र शहरात कायदेशीर स्वरुपात भांगची शेती करण्याची अनुमती देण्यात आली आहे. जगभरात वापरल्या जाणाऱया चरसचा 40 टक्के पुरवठा याच शहरातून केला जातो.
येथी लाखो लोकांसाठी भांगची शेती हेच उत्पन्नाचे एकमात्र साधन आहे. स्थानिक लोक बाहेरून येणाऱया लोकांना पसंत करत नाहीत. पण तरीही पर्यटक येथे पोहोचतात. येथे पर्यटक प्रामुख्याने उन्हाळय़ात दाखल होतात. निळय़ा रंगाच्या या शहराला उन्हाळय़ात अधिकच सौंदर्य प्राप्त होते. ऍन्डल्युसिया संस्कृती आजही शहराच्या कानाकोपऱयात अस्तित्व दर्शविते. हा देश मुस्लीम आणि ज्युइश लोकसंख्येमुळे एकेकाळी समृद्ध होता, ज्याचा ठसा शहराच्या नकाशात दिसून येतो.