निवडणूक आयोगातर्फे पणजीत प्रबोधन, प्रोत्साहन प्रदर्शन : फुटबॉपटू ब्रुनो कुतिन्होंच्याहस्ते उद्घाटन : रविवारपर्यंत सर्वांसाठी प्रदर्शन खुले
प्रतिनिधी /पणजी
निवडणूक प्रक्रियेत राज्यातील प्रत्येक मतदाराचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आयोजित प्रदर्शनाचे गोव्यातील प्रसिद्ध फुटबॉलपटू तथा भारतीय संघाचे माजी कर्णधार ब्रुनो कुतिन्हो यांच्याहस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले.
पणजीतील कला अकादमीजवळील दयानंद बांदोडकर मैदानावर आयोजित या पाच दिवसीय मतदार जागृती मल्टीमीडिया प्रदर्शनाचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फील्ड आऊटरीच ब्युरोद्वारे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर बोलताना श्री. कुतिन्हो यांनी प्रत्येक मतदाराने स्वतःचा मतदान हक्क बजावण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. विशेषतः प्रथमच मतदान करणाऱया युवा मतदारांनी मोठय़ा संख्येने बाहेर पडून आपला हक्क बजावावा असे त्यांनी नमूद केले.
उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची उपस्थिती होती. नागरिकांना निवडणुकीसंबंधी विविध पैलूंबद्दल प्रबोधन व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले. निवडणूक आयोग आगामी निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करत आहे. आम्ही आमच्या मतदान केंद्रांमध्?ये पायाभूत सुविधा सुधारत आहोत आणि ज्ये÷ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्?था निर्माण करण्?यात येत आहे. गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे लोकांनी मतदानासाठी वचनबद्ध राहिले पाहिजे, असे कुणाल म्हणाले.
मतदार शिक्षण, मतदार जागरूकता पसरवणे आणि भारतातील मतदार साक्षरतेला चालना देण्यासाठी प्रमुख कार्यक्रम आहे. त्याचबरोबर लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे, मतदार नोंदणी आणि मतदानाद्वारे निवडणुकीत सहभाग वाढविणे, भारतातील लोकशाही आणि मतदान प्रक्रियेबद्दल सातत्यपूर्ण शिक्षण देणे, आदी उद्देशही या आयोजनामागे आहेत, असे कुणाल यांनी पुढे सांगितले.
प्रदर्शनात सुमारे 40 डिस्प्ले आणि एलईडी आहेत तसेच गोवा तसेच देशातील निवडणूक प्रक्रियेचे दुर्मिळ फोटो समाविष्ट आहेत. प्रदर्शनात एक सिग्नेचर वॉल देखील आहे जिथे प्रेक्षक त्यांचा ऑटोग्राफ देऊ शकतात. हे प्रदर्शन रविवार, 16.01.2022 पर्यंत लोकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, याच उपक्रमाचा भाग म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. फील्ड प्रचार अधिकारी रियास बाबू यांच्याहस्ते पाहुण्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.