Tarun Bharat

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

नुकतंच सर्वोच्च न्यायानलयाने ओबीसी राजकिय आरक्षणाला स्थिगिती दिली आहे. यामुळे राज्यभरात या प्रवर्गात समावेश होणाऱ्या नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला असुन या निर्णायानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. या टप्यावर राज्यातील १०६ नगरपंचायतींमधील ४०० जागांवर निवडणुका होणार होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणावरील कायदेशीर पेचानंतर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित जागांची निवडणूक जरी स्थगित केली असली तरी इतर प्रवर्गातील जागांवर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच निवडणुका होणार आहेत. राज्यात १०६ नगरपंचायतींमधील एकूण १ हजार ८०२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. १,८०२ पैकी ३३७ जागांवर ओबीसी आरक्षण आहे.

नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत ओबीसी राखीव जागांच्या निवडणुकाही स्थगित

भंडारा नगरपरिषदेत एकूण ५२ जागांवर निवडणूक होत आहे. त्यातील १३ जागा ओबीसी राखीव आहेत. त्यालाही स्थगिती मिळाली आहे. गोंदियातील जिल्हा परिषदेत ५३ पैकी १० ओबीसी जागांच्या निवडणुका स्थगित आहेत. पंचायत समितीत ४५ ओबीसी जागा आणि महानगरपालिकेची १ जागा यांच्या निवडणुकीलाही स्थगिती देण्यात आली आहे.

Related Stories

इंडियन ऑईलच्या कॅम्पसला भीषण आग; तिघांचा मृत्यू, 35 जखमी

datta jadhav

पक्षातील मित्र व सहकाऱ्यांनी आम्हाला सोडून जाऊ नये ; मिलिंद देवरांनी व्यक्त केली इच्छा

Archana Banage

शाहुवाडी : खुटाळवाडीतील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील ३५ जणांना केले क्वारंटाईन

Archana Banage

फडणवीस पुढील 25 वर्ष वैफल्यग्रस्तच राहतील

datta jadhav

योगी सरकारला दारूतून 36 हजार कोटींचा महसूल

datta jadhav

देशात ६० हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण

Archana Banage