Tarun Bharat

निवडणूक कर्तव्यावरील एएसआयचा हृदयाघाताने मृत्यू

घटप्रभा येथील एसबीटी पियु कॉलेजमधील घटना

प्रतिनिधी / बेळगाव

निवडणूक कर्तव्यावरील एका साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा (एएसआय) हृदयाघाताने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी घटप्रभा येथील एसबीटी पियु कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे.

जगदीश बसवंताप्पा पुजेरी (वय 57, मूळचा रा. बैलहोंगल) असे त्या एएसआयचे नाव आहे. जगदीश पुजेरी हे यमकनमर्डी पोलीस स्थानकात सेवा बजावत होते. त्यांची पत्नी बैलहोंगल येथे शिक्षिका आहे. सध्या निवडणूक कर्तव्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मतदान केंद्रांना भेटी देताना घटना

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील गोकाक विधानसभा मतदारसंघात त्यांची नियुक्ती झाली होती. मतदान केंद्रांना भेटी देताना घटप्रभा येथील एसबीटी पियु कॉलेजमध्ये ते बाथरुमला गेले. बाथरुम बाहेरच हृदयाघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

बेळगावच्या आणखी एका वकिलाची न्यायाधीशपदी नियुक्ती

Amit Kulkarni

संततधार पावसाने शेतकरी हतबल

Patil_p

ब्लॅक फंगसवरील औषधांचा तुटवडा

Amit Kulkarni

येडूर येथे रांगोळी स्पर्धा उत्साहात

Patil_p

लॉकअप डेथ प्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चौकशी

Amit Kulkarni

केएलईमध्ये प्रथमच लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

Omkar B