Tarun Bharat

निवडणूक गैरप्रकार रोखण्यासाठी शॅडो कौन्सिल मोहीम राबविणार

क्रांतिदिनाचे औचित्य साधून शपथ घेण्याचा कार्यक्रम

प्रतिनिधी / मडगाव

‘शॅडो कौन्सिल फॉर मडगाव’ तसेच मडगाव पालिका क्षेत्रातील नागरिकांनी निवडणुकीच्या कालावधीत होणाऱया गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच प्रामाणिक व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून याव्यात यासाठी मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून गुरुवारी मडगावच्या लोहिया मैदानावर तशी शपथ घेऊन या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

सर्रास बोकाळलेल्या व अनियंत्रित गैरकारभारांमुळे निवडणूक प्रक्रियेची पत कशी खालावली आहे ते आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारा अनिष्टचक्रात आम्ही कसे अडकलेलो आहोत तेही पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना लाच देण्याचे प्रकार होत असतात आणि निवडून आल्यावर ती रक्कम सरकारी तिजोरीतून वसूल केली जाते तसेच हजारो पटींनी अधिक रकमेचा अपाहार केला जातो, असे शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी म्हटले आहे.

प्रत्येक मतदार मतदानासाठी लाच स्वीकारत नाही. परंतु जर सर्व प्रामाणिक मतदारांनी एकत्रितपणे काम केले, तर भ्रष्टाचारी उमेदवाराला नक्कीच बाहेरचा दरवाजा दाखविला जाऊ शकतो, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले. यावेळी मतदारांना लाच देण्याच्या प्रकारांना आळा बसावा याकरिता प्रयत्न करण्याची तसेच गरज पडल्यास अशा लाच देणाऱया उमेदवारांना नाकारण्याची हांक देण्याची शपथ घेण्यात आली. लोकांनी निर्भिडपणे बाहेर सरून मतदान प्रक्रियेत सहभाग दर्शवावा याकरिताही प्रयत्न करण्याची शपथ याप्रसंगी घेण्यात आली.

Related Stories

..एकदाच्या दहावीच्या परीक्षा झाल्या! पालक सुखावले, बालक बिनधास्त

Omkar B

पर्वरीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करा

Amit Kulkarni

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणच्या जत्रोत्सवाची सांगता

Amit Kulkarni

शेकोटी संमेलनाची उत्साहात सांगता

Amit Kulkarni

दुषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाल्याचा संशय

Patil_p

‘एक मनोहर कथा’ पुस्तक कोकणीतून यायलाच हवं..

Amit Kulkarni