Tarun Bharat

निवडणूक पदवीधरांची प्रचारात उठाठेव राजकारण्यांची

Advertisements

चंद्रकांत देवरुखकर/ सातारा

सध्या पुणे विभागात सर्वत्र पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची लगबग सुरु आहे. पदवीधर मतदार संघासाठी 000 एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात असून शिक्षक मतदार 000 एवढे उमेदवार नशीब अजमावत आहेत. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून पदवीधर मतदार संघात 4 लाख 26 हजार 257 एवढे तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 एवढे मतदार आहेत. शिक्षित माणसे विधान परिषदेत जावीत व तिथे चांगले मुद्दे मांडले जावेत यासाठी पदवीधर व शिक्षक आमदारांची संकल्पना समोर आली असली तरी त्यात सध्या राजकारण्यांची उठाठेवच मोठया प्रमाणात सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.

इतर निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीचाही बाजार झाला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला, मग तो नातेवाईक असो किंवा जवळचा कार्यकर्ता किंवा विधानसभेच्या निवडणुकीत नाराज असलेला नेता अशा लोकांचा पक्षाकडून पदवीधर मतदारसंघासाठी विचार होतो. ज्या पवित्र उद्देशाने पदवीधर मतदारसंघाची योजना झाली. त्या उद्दिष्टाला हरताळ फासला असल्याचं मत अभ्यासक मतदार व्यक्त करत असले तरी सध्या या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 

प्रकाश जावडेकर व चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघावर पाचवेळा भाजपचा झेंडा लावला. यामुळे येथे भाजपचा वरचष्मा आहे. पुणे विभागीय पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत. हे दोन्ही पक्ष उमेदवारी कोल्हापूर, सांगलीला देणार की पुण्याला हे पंधरा दिवसात निश्चित होणार आहे. काटाजोड लढतीची अपेक्षा असल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावत पक्षीय नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि जनता दल सेक्युलरचे शरद पाटील हे तीनही उमेदवार सांगलीतील आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागणी होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे उमेदवारांची मदार पुण्यावर अवलंबून असणार आहे. तसेच कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱयावर या उमेदवारांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार लिस्ट

या मतदारसंघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार सोलापूरमधील आहेत. काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर कोल्हापूरचे आहेत. ’मनसे’चे विद्यानंद मानकर आणि अपक्ष उमेदवार संतोष फाजगे पुण्यामधील उमेदवार आहे. या सर्व उमेदवारांची भिस्त पुण्यावर आहे. पुण्यातून सर्वाधिक मते घेणारा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य पुणे ठरविणार असल्याचे स्पष्ट आहे.  

पुण्यातील मतदार निर्णायक ठरणार?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये ’मनसे’ वगळता अन्य प्रमुख राजकीय पक्षांनी पुण्याबाहेरील उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पुणे शहर आणि परिसरातील मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान या उमेदवारांसमोर असणार आहे. पदवीधर मतदारसंघातील लाड, देशमुख आणि शरद पाटील हे तिन्ही उमेदवार सांगलीतील आहेत. केवळ ऍड. रूपाली ठोंबरे पाटील या पुण्यातील आहेत. शिक्षक मतदारसंघामधील पवार आणि सावंत सोलापूर जिह्यातील, आसगावकर कोल्हापूरमधील; तर मनसेचे मानकर पुण्यामधील आहेत.

Related Stories

आदेश आल्याशिवाय एक ही एसटी धावणार नाही: आगार प्रमुख वाकळे

Archana Banage

सातार्‍यात भटक्या प्राण्यांची दादागिरी

Archana Banage

चिंताजनक : नागपूरमध्ये एका दिवसात 3,370 नवे रुग्ण ; 16 मृत्यू

Tousif Mujawar

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच होणार!

datta jadhav

निगवे दुमालातील सलून दुकानदार पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने खळबळ

Archana Banage

पाशवी बहुमताच्या जोरावर आता बळी गाडला जाणार नाही – शेट्टी

Archana Banage
error: Content is protected !!