Tarun Bharat

”निवडणूक लावून आपण चुक केल्याचं भाजपच्या लक्षात आलंय”

Advertisements

ऑनलाईन टीम / कोल्हापूर

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसच्यावतीने उमेदवारी घोषित केलेल्या आणि कोल्हापूरचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांचा ही आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार म्हणुन अर्ज करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, उमेदवार जयश्री जाधव यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते ही यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले कि, हे काँग्रेस अनुकूल वातावरण पाहून भाजपच्या पायाखालील वाळु सरकलेली आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटील हे आता वैयक्तीतीगत पातऴीवर टीका करत आहेत. तसेच ही निवडणूक लावून आपण चुक केल्याचं भाजपच्या लक्षात आलंय असं ही ते यावेळी म्हणाले. तसेच 2019 च्या निवडणूकीत भाजपने शिवसेनेच्या बरोबर राहत अपक्ष उमेदवार उभे केले आणि शिवसेनेच्या पाटीत खंजीर खुपसल्याच संपुर्ण जिल्ह्याने पाहीलेलं आहे. त्यामुळे भाजपबद्दल लोक चांगलेच जाणून आहेत.

गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसने काय विकास केला हे सांगण्यासाठी आपण कधी ही बिंदू चौकात यायला तयार आहे. असं ते म्हणाले. तसेच ही निवडणूक दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर मृत्यू ओढवल्याने लढावी लागत आहे. कदाचीत भाजपला याचा विसर पडला आहे. म्हणुन ते रॅली काढतायेत मात्र काँग्रेसने हा विचार केला असुन कोणताही गाजावाजा न करता आपण हा अर्ज दाखल करत असल्याचं ही ते यावेळी म्हणाले. तसेच या निवडणूकीत काँग्रेस विजयी होईल असा ही दावा यावेळी सतेज पाटील यांनी यावेळी केला.

Related Stories

शिरोळ शहर पुन्हा चार दिवस बंद नागरिक खरेदीसाठी एकच गर्दी प्रशासन हतबल

Abhijeet Shinde

किरीट सोमय्या यांचा मोर्चा मंत्री मुश्रीफांकडे, आयकर विभाग मुश्रीफांना ताब्यात घेण्याची शक्यता?

Abhijeet Shinde

व्वा! उद्योगपती आनंद महिंद्राना कोल्हापुरच्या फोटोने घातली भुरळ, हा फोटो केला ट्विट

Abhijeet Shinde

राजू शेट्टींनी चूकच केली ; स्वाभिमानी कार्यकर्ते बरसले

Abhijeet Shinde

कोनवडे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुभाष पाटील यांची निवड

Abhijeet Shinde

कोल्हापूर : किल्ल्यांवर पहारा देण्यासाठी मावळे सज्ज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!