Tarun Bharat

निवळीत इनोव्हा-फॉर्च्युनरमध्ये समोरासमोर धडक

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी कोकजेवठार येथे इनोव्हा-फॉर्च्युनर कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल़ी या अपघातात फॉर्च्युनर मधील दोघे जण जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़  याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी इनोव्हा चालकावर गुन्हा दाखल केला आह़े

नुरजहाँ इब्राहिम मुकादम (65) व अफसा इस्माईल मुकादम (10, ऱा शेटय़ेनगर रत्नागिरी) अशी अपघाता मधील जखमींची नावे आहेत़ याप्रकरणी पाच्युनर चालक इब्राहिम अहमद मुकादम यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इब्राहिम मुकादम हे आपल्या ताब्यातील पार्च्युनर गाडी (एमएच 08 आर 6237 ) घेवून मुंबईच्या दिशेने जात होत़े यावेळी त्यांच्या सोबत पत्नी नुरजहाँ व नात अफसा हे प्रवास करत होत़े

दरम्यान निवळी कोकजेवठार येथे इनोव्हा कार (एमएच 02 डीजे 9489) हिने विरूद्ध दिशेने येवून फॉच्युनरला जोरदार धडक दिल़ी यामध्ये चालकाच्या बाजूच्या बसलेली नुरजहाँ व त्यांच्या नात अफसा या दोघी जखमी झाल्य़ा याप्रकणी इनोव्हा चालकावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Related Stories

परशुराम घाट 9 जुलैपर्यंत बंद राहणार!

Patil_p

माजी सैनिकांचे कॅन्टीन पूर्ववत सावंतवाडीत

NIKHIL_N

गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृतिदिनी आचरेत मधुरांजली

Anuja Kudatarkar

Ratnagiri : जेली चॉकलेटने श्वास कोंडून 9 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

चार हजार वाहन चालकांना दंड

NIKHIL_N

जमावबंदी मोडणाऱया शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करा!

NIKHIL_N