Tarun Bharat

निवृत्त कर्मचाऱयांची मनपा नोकर संघटनेकडे धाव

टाईमस्केलवर काम केलेल्या कर्मचाऱयांना वेतन देण्याकडे कानाडोळा

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिकेत कायमस्वरुपी सेवेत रूजू होण्यापूर्वी टाईमस्केलवर काम केलेल्या कर्मचाऱयांना दोन वर्षांचे वेतन देण्याचा आदेश नगर प्रशासनाने बजावला आहे. यानुसार दोन वर्षांचे वेतन देण्याची मागणी निवृत्त कर्मचाऱयांनी महापालिकेकडे केली होती. दीड वर्ष उलटले तरी याबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्याने निवृत्त कर्मचाऱयांनी महापालिका नोकर संघटनेकडे धाव घेऊन निवेदन दिले आहे.

निवृत्त कर्मचाऱयांना देण्यात येणारे आर्थिक लाभ वेळेवर दिले जात नाहीत. तसेच निवृत्ती वेतनासह विविध लाभ मिळविण्यासाठी कर्मचाऱयांना नेहमीच धावपळ करावी लागते. अशातच टाईमस्केलवर काम केलेल्या कर्मचाऱयांचे दोन वर्षांचे वेतन देण्याचा आदेश नगर प्रशासनाने 27 मे 2019 रोजी बजावला आहे. त्यामुळे या आदेशानुसार पात्र निवृत्त कर्मचाऱयांना याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन करण्यात आली होती. निवृत्त कर्मचाऱयांच्यावतीने दि. 8 मे 2020 रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. पण अद्याप कर्मचाऱयांना वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱयांनी महापालिका नोकर संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर यांची भेट घेऊन समस्येची माहिती देण्यात आली. तसेच टाईमस्केलवर काम केलेल्या कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशी विनंती संघटनेकडे करण्यात आली आहे.

Related Stories

शुक्रवारची बैठकही लांबणीवर

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांबरोबर जिल्हय़ातील मंत्र्यांची आणि अधिकाऱयांची चर्चा

Patil_p

माळमारूती येथील गाळय़ांसाठी चढाओढ

Patil_p

मजगावात महिलेची गळफासाने आत्महत्या

Omkar B

40 ग्राम पंचायतींना मिळणार कचरावाहू वाहने

Omkar B

कॅन्टोन्मेंट बोर्डवर उद्यापासून प्रशासकीय राजवट

Amit Kulkarni