Tarun Bharat

निष्पापाला पाहून मारेकऱयाचे मन बदलले

पतीने दिली होती पत्नी अन् मुलाला मारण्याची सुपारी

उत्तरप्रदेशच्या गाजियाबादमये अत्यंत रंजक आणि हैराण करणारी घटना घडली आहे. विम्याच्या रकमेसाठी एका व्यक्तीने स्वतःची पत्नी आणि मुलाला मारण्याची सुपारी दिली. कॉन्ट्रक्ट किलर (मारण्याची सुपारी घेणारा) आरोपीच्या पत्नी अन् मुलाला मारण्यासाठी गेला असता 4 वर्षीय मुलाला पाहून त्याचे मन बदलले. त्याने कुणाचीच हत्या केली नाही, तसेच महिलेला तिच्या पतीचे सत्य सांगून फरार झाला.

आझमगढमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेल्या अजय यादवची पत्नी राखी मूळची बिहारची आहे. दोघांचाही चार वर्षांपूर्वी विवाह झाला होत. विवाहानंतर दोघांमधील कुरबुरी वाढल्या होत्या. पतीचे विवाहबाहय़ संबंध असल्याचा संशय राखीला होता. रोजच्या भांडणांनी हैराण आािण पत्नीच्या नावावरील विम्याची रक्कम हडपण्यासाठी अजयने एक कट रचला.

अजयने पत्नी आणि मुलाला संपविण्यासाठी मित्र रामप्रसादची मदत घेतली. रामप्रसदाने त्याची सुपारी किलर गजराजशी भेट घडवून दिली. यादवने पत्नी आणि मुलाची हत्या करताना ती दुर्घटना वाटावी असे गजराजला सांगितले होते. याकरता गजराजला 10 लाख रुपये मिळणार होते. 25 फेब्रुवारी रोजी गजराज सेल्समनच्या रुपात यादवच्या घरी पोहोचला. तेथे 4 वर्षीय मुलाला पाहून गजराजमधील अपराधीपणाच्या भावनेने उचल खाल्ली. त्याने राखीला सर्वकाही सांगून टाकले. तसेच यादवची सुपारी देतानाची चित्रफितही त्याने दाखविली. या सर्व प्रकारानंतर राखीने स्वतःच्या पतीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी अजय यादव आणि रामप्रसादला अटक केली आहे.

Related Stories

शेतकऱ्यांसाठी मोठ्य़ा घोषणा

Patil_p

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महाग

Patil_p

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद

datta jadhav

ममता बॅनर्जींचा मोठा विजय

Archana Banage

कर्नाटकच्या रश्मी सामंतने रचला इतिहास

Patil_p

अयोध्या अन् साधू-संतांच्या छावण्या

Patil_p