नवी दिल्ली : निस्सान कंपनीची नवी मॅग्नाईट ही कार बाजारात दाखल होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कंपनीच्या सूत्रानुसार ही गाडी 2 डिसेंबरला भारतात लॉन्च केली जाणार आहे. या गाडीची किंमत किती असणार आहे हे स्पष्ट करण्यात आले नाही. पण या गाडीची पहिली विक्रीची सुरुवात भारतातून केली जाणार असल्याचे समजते. ही नवी गाडी ब्रीझा, वेन्यू, नेक्सॉन, एस्कॉर्ट, अर्बन प्रुझर, सोनेट या गाडय़ांशी स्पर्धा करणार आहे.


previous post