Tarun Bharat

निस्सानच्या कार उत्पादनात होणार घट

टोकीयो

 कार निर्माती कंपनी निस्सान मोटर्सने येणाऱया काळात वाहन उत्पादनात घट होणार असल्याचे म्हटले आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवडय़ामुळे कार निर्मितीच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनी सध्या नोट ही अधिक विक्रीची लोकप्रिय गाडी निर्मिती करते आहे. या कारच्या निर्मिती प्रक्रियेला विलंब होणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे  जपानमधील होंडा मोटर्सच्या कार उत्पादनातही जानेवारीमध्ये परिणाम होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑटो निर्माता कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनवणाऱया निर्मात्यांना जागतिक स्तरावर चीपचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे याचा परिणाम उत्पादनांच्या निर्मितीवर जाणवतो आहे.

Related Stories

बँक ऑफ महाराष्ट्र नफ्यात

Patil_p

दमानींच्या कंपनीचे समभाग उच्चांकी पातळीवर

Patil_p

लोढा डेव्हलपर्सचा येणार आयपीओ

Amit Kulkarni

सेन्सेक्सचा आर्थिक वर्षाचा प्रारंभ उत्साहासोबत

Patil_p

बायोकॉन हिंदुजामध्ये वाटा घेणार

Omkar B

बाजाराची रिलायन्स, टाटासह अन्य कामगिरीवर नाराजी

Patil_p