Tarun Bharat

निस्सान मोटर इंडियाचा उत्पादन वाढीवर भर

महिन्याला 3 हजार 500 कार्सची करणार निर्मिती – ‘मॅग्नाइट’ला मागणी वाढली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निस्सान मोटार इंडियाने आपल्या उत्पादन प्रक्रियेला वेग देण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या मागणीची दखल घेऊन निस्सान मोटर इंडियाने मॅग्नाइट या कारच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या चेन्नईमधील उत्पादन क्षमतेत कंपनीने वाढ करण्यास सुरुवात केली असून जुलैपासून महिन्याला 3 हजार 500 प्रति महिना कार्सची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. स्पोर्टस् युटिलीटी गटातील निस्सानच्या ‘मॅग्नाईट’ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. जवळपास 50 हजार जणांनी या गाडीचे बुकींग केले असल्याचे समजते.

विक्रीत वाढ

निस्सान मोटर इंडियाची बाजारातील वाटचाल आशादायी राहिली आहे. कारण कंपनीच्या कार्सना लोकप्रियता अधिकची मिळताना दिसते आहे. दरम्यान निस्सान मोटर इंडियाच्या 2020-21 आर्थिक वर्षामध्ये कार विक्रीमध्ये 6 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. 2020-21 आर्थिक वर्षामध्ये 18 हजार 886 गाडय़ांची विक्री केली असून हीच मागील आर्थिक वर्षात 17 हजार 831 इतकी विक्री राहिली होती. कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या दरम्यान कंपनीची पुरवठा साखळी मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली होती.

उत्पादन प्रक्रिया वेग घेणार

निस्सान मोटर इंडियाने लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर आपले कारखाने सुरू केले असून आता मागणीचा कल पाहून उत्पादन क्षमता गतीने वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. मध्यंतरी सेमीकंडक्टरच्या पुरवठय़ावर परिणाम झाल्याने उत्पादन क्षमतेवर याचा परिणाम दिसून आला. गेल्या डिसेंबरमध्ये कंपनीने उत्पादनक्षमता वाढवण्याबरोबरच 1 हजार जणांची भरती केली जाणार असल्याचे म्हटले होते. चेन्नईमधील कारखान्यातील कार्सच्या उत्पादन वाढीवर सध्या लक्ष दिले जाणार आहे. महिन्याला 3 हजार 500 कार्स उत्पादीत करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

Related Stories

शेअर बाजारात 545 अंकांची बरसात

Patil_p

‘रिलायन्स’ देशातील तिसरा मोठा व्यावसायिक समूह

Patil_p

शेअर बाजारात दमदार तेजीचा धडाका

Patil_p

हेक्सागॉन न्युट्रीशनचा येणार आयपीओ

Patil_p

सार्वजनिक क्षेत्रातील बँका डिसेंबरपर्यंत 300 शाखा उघडणार

Patil_p

चालू वर्षात स्मार्टफोन विक्रीत घसरणीचे संकेत

Patil_p