Tarun Bharat

‘नीट’ परिक्षार्थींना गोव्यात थेट प्रवेश द्या!

मंत्री उदय सामंत यांची उत्तर प्रदेशच्या महासंचालकांकडे मागणी

अन्यथा रत्नागिरी, सिंधुदुर्गात परीक्षा केंद्र निर्माण करावे!

प्रतिनिधी / कणकवली:

मानव संसाधन विकास मंत्रालयाने राज्यांच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचे आयोजन केले आहे. गोवा सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश मिळावा किंवा या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये परीक्षेच्या केंद्राची निर्मिती करावी. जेणेकरून या विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी उत्तर प्रदेश नोएडा येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनीही यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

मानव संसाधन विकास मंत्रालयाने राज्यांच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचे आयोजन केले आहे. त्यानुसार भारतातील 155 शहरातील केंद्रांची ही परीक्षा घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सुमारे 35,000 विद्यार्थी या परीक्षेला प्रवि÷ झाले आहेत. त्यात  सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सुमारे 300 आणि रत्नागिरी जिल्हय़ातील 500 विद्यार्थी  परीक्षेला बसत आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दुर्गम व डोंगराळ जिल्हे आहेत. याठिकाणी कनेक्टिव्हिटीच्या समस्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र म्हणून गोव्याची निवड केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने गोव्यात येणाऱया व्यक्तींसाठी स्वॅब चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे या दोन जिल्हय़ांतील विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देण्यासाठी समस्या निर्माण होत आहे.

सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांसाठी स्वॅब चाचणीत शिथीलता आणावी व त्यांना परवानगी द्यावी. गोव्यात परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश मिळावा किंवा सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये परीक्षेच्या केंद्राची निर्मिती करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

Related Stories

वाईल्ड सिंधुदुर्ग डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आज निसर्गप्रेमींच्या भेटीला

NIKHIL_N

नववधूची मतदान केंद्रावर एन्ट्री ; बजावला मतदानाचा हक्क

Anuja Kudatarkar

कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 42

Patil_p

कोल्हापूर : वाघबीळ घाटात ट्रकचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

Archana Banage

रत्नागिरी जिल्हय़ात आणखीन तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह

Patil_p

धपोली रुग्णालय इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

Patil_p