Tarun Bharat

नीती आयोगाचे धोरण कारखानदारांच्या हिताचे

तीन टप्प्यातील एफआरपी धोरणाने शेतकरी कोलमडणार, माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका

प्रतिनिधी/ कोल्हापूर

साखर उद्योगाला स्थिरता येण्याच्या नावाखाली निती आयोग कारखानदारांच्या हिताचे काम करत आहे. त्यांना शेतकऱयांशी काहीही सोरसुतक नाही. असा आरोप स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. यातूनच तीन टप्प्यातील एफआरपीची शिफारस पेंद्राकडे आयोगाने केली आहे. हे धोरण शेतकरी अहिताचे आहे. ते कदापि सहन करणार नाही. प्रसंगी रस्त्यावरची लढाई सुरु करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, वैभव कांबळे, जनार्दन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, एक वर्षाच्या आत शेतकऱयांला सेवा सोसायटीची पीककर्ज भरावे लागते. एक दिवस जरी पुढे गेला तर सात टक्के प्रमाण व्याज द्यावे लागते. आता निती आयोगाच्या शिफारशी नुसार एकरकमी एफआरपी मिळणार नाही. पहिल्यांदा 60 टक्केच मिळणार आहे.

त्यातही तोडणी ओढणी खर्च कपात


होणार आहे. त्यामुळे पीककर्जही भागणार नाही. तर कारखानादारांने दिलेली खतांची उचल कपात करुन पहिला हप्ता देणार आहेत. त्यामुळे शेतकऱयाच्या हातात काहीच पडणार नाही. म्हणून एफआरपीचे तुकडे आम्ही पाडू देणार नाही. निती आयोगाने सर्वसमावेशक धोरण ठेऊन शिफारस करणे अपेक्षित होते. मात्र त्यांचा हा एकतर्फी निर्णय आहे. तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडू असा इशारा दिला.
उपपदार्थासह 75ः25 व निव्वळ साखरेच्या उत्पन्नावर 80ः20 असा फॉर्मुला असला पाहिजे अशी मागणी सातत्याने करत आहोत. महसुली उत्पन्न काढताना 2012 मध्ये सि. रंगराजन समितीने सुचविलेल्या शिफारशीप्रमाणे म्हणजे साखर व प्राथमिक उपपदार्थ असलेल्या मळी बग्यास व प्रेसमढ बरोबर केंद्र सरकारच्या धोरणानुसार हेवी मोल्यासिस इथेनॉलचे उत्पन्न एकूण महसुली उत्पन्नात धरण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

राज्य सरकारने चुकीच्या तरतुदी करून शेतकऱयांचे नुकसान केले आहे. असा आरोपही शेट्टी यांनी केला. शेतकरी विरोधी म्हणून भाजपमुक्त जिल्हा केला. पण त्यापेक्षाही वरचढ आघाडीतील तीन पक्ष ठरले आहेत. त्यांचेही धोरण शेतकरी हिताचे दिसत नाही. अशी टिका केली.

तक्रारसाठी मिस्ड कॉल द्या
निती आयोगाचा हा चुकीचा कारभार शेतकऱयांपर्यंत पोहचण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर शेतकऱयांची जागृती करणार आहे. निती आयोगाची सिफारस मान्य नाही हा एकत्रित डाटा संकलन करण्यासाठी शेतकऱयांनी 8481583751 या नंबरवर फक्त मिस्ड कॉल करण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.

आमचे हात बांधले नाहीत
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला याविषयी विचारले असता शेट्टी म्हणाले आमचे हात बांधलेले नाहीत. पण संबधीतावर गुन्हा दाखल झाला आहे गृह विभागाने दखल घेतली आहे. पुढे काय होते ते पाहू.

Related Stories

कुस्तीच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून निधी द्या – अभिनेत्री दीपाली सय्यद

Abhijeet Khandekar

Kolhapur : इंडिगोची नवीन एअरलाइन्स विमानसेवा उद्यापासून सलग सात दिवस सुरू

Archana Banage

भाजप 27 टक्के तिकिटे ओबीसींना देणार, चंद्रकांत पाटलांची ग्वाही

datta jadhav

पुलाची शिरोलीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, कार्यालयांची तोडफोड; 54 जणांना अटक

Tousif Mujawar

”पंतप्रधान मोदींचे मौन हे द्वेषपूर्ण आवाजांना बळ देणारे”

Abhijeet Khandekar