Tarun Bharat

नीना स्पोर्ट्स, टॅलेंट हुबळी, भटकळ स्पोर्ट्स क्लब संघ विजयी

केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी नीना स्पोर्ट्स संघाने श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाचा 9 गडय़ांनी, टॅलेंट स्पोर्ट्स संघाने आनंद अकादमी संघाचा सहा गडय़ांनी, भटकळ क्लब संघाने स्पोर्ट्स अकादमी गदग संघाचा 23 धावानी पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळविले. इब्राहिम गुलरेज (भटकळ), रवीकुमार सक्री (टॅलेंट), अंगदराज हित्तलमनी (नीना) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

बेळगावच्या केएससीए मैदानावर श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने 28.4 षटकात सर्व गडी बाद 141 धावा केल्या. सुरेशचंद्रा कोनूरने 7 चौकारासह 39, अभिषेक बालेकाईने 42, अभिषेक देशपांडेने 23 धावा केल्या. नीनातर्फे काविश मुकण्णावरने 4 धावात 3, माजीद मकानदारने 12 धावात 3, तर विनायक कांबळे व अंगदराज हित्तलमनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल नीना स्पोर्ट्स संघाने 16.3 षटकात 1 गडी बाद 146 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. त्यात दर्शन पाटीलने 4 षटकार 9 चौकारासह 72, अंगदराज हित्तलमनीने 1 षटकार 8 चौकारासह नाबाद 44, चेतन पांगिरेने 3 चौकारासह 22 धावा केल्या. सिद्धारूढतर्फे यल्लाप्पा काळेने 1 गडी बाद केला.

आरआयएस हुबळी मैदानावर आनंद क्रिकेट  अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 32 षटकात सर्व गडी बाद 105 धावा केल्या. त्यात केतज कोल्हापुरेने 27, किसन मेघराजने 18, तर नागेंद पाटीलने 13 धावा केल्या. टॅलेंट्स स्पोर्ट्सतर्फे रविकुमार सक्रीने 19 धावात 3, भार्गव नाडगेरने 20 धावात 3, हरिष कुलकर्णीने 2, तर अझर नदाफ व श्रवण टी. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना टॅलेंट स्पोर्ट्स हुबळी संघाने 26.3 षटकात 4 गडी बाद 107 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. अनंत नाडगेरने नाबाद 26, सचिन पाटीलने 24, भार्गव नाडगेरने 19, रवीकुमार सक्रीने नाबाद 16 धावा केल्या. आनंदतर्फे झिशानअली सय्यद व केतज कोल्हापूरे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

केएससीए हुबळी मैदानावर भटकळ स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी बाद 266 धावा केल्या. त्यात इब्राहीम गुलरेजने 1 षटकार, 11 चौकारासह 100 धावा करून शतक झळकवले. त्याला महंमद झियानने 8 चौकारासह 56, अब्दुल बाकीने 30 धावा करून साथ दिली. स्पोर्ट्स अकादमी गदगतर्फे सचिन पाटीलने 42 धावात 3 तर दिवेश जैनने 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना स्पोर्ट्स अकादमी गदग संघाने 50 षटकात 8 गडी बाद 243 धावाच केल्या. त्यात शुभम जैनने 2 षटकार, 6 चौकारासह 100 धावा करून शतक झळकविले. त्याला सचिन पाटीलने 34, सुभाष अंगडीने 26, कार्तिक बागलगोटने 30, तर चिन्मय कुलकर्णीने 17 धावा करीत सुरेख साथ दिली. भटकळतर्फे महंमद इम्रानने 40 धावात 4, महंमद आरिफ व इब्ा्राहीम गुलरेज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Related Stories

1 नोव्हेंबर काळादिन विशेष

Amit Kulkarni

सराफी पेढीतील चेन पळविणाऱया जोडगोळीला अटक

tarunbharat

वसती बसेस बंद झाल्याने दक्षिण भागातील ग्रामस्थांचे हाल

Amit Kulkarni

गृहशोभा प्रदर्शनाचे उद्घाटन

Omkar B

ओंकारेश्वर मल्टिपर्पज सौहार्द सोसायटीची सभा खेळीमेळीत

Omkar B

विकेंड लॉकडाऊनमुळे दुपारनंतर शहरात नीरव शांतता

Amit Kulkarni