Tarun Bharat

नीरजची भालाफेक ऑलिम्पिकच्या 10 मॅजिकल मोमेंट्समध्ये!

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्ण जिंकले, त्या थ्रोचा ट्रक अँड फिल्डमधील 10 सर्वोत्तम मॅजिकल मोमेंट्समध्ये समावेश केला गेला आहे. वर्ल्ड ऍथलेटिक्सने बुधवारी याची माहिती दिली.

‘ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचे नाव ऐकिवात होते. मात्र, टोकियोत भालाफेकीचे सुवर्ण जिंकल्यानंतर त्याचा प्रोफाईल स्काय-रॉकेटेड झाला’, असे वर्ल्ड ऍथलेटिक्सने यावेळी नमूद केले. 23 वर्षीय नीरज चोप्राने भारताला ऍथलेटिक्समधील पहिलेवहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देताना मागील शनिवारी 87.58 मीटर्सचा लक्षवेधी थ्रो केला होता. ऑलिम्पिक इतिहासात भारताला सुवर्ण जिंकून देणारा वैयक्तिक गटातील तो केवळ दुसराच क्रीडापटू ठरला.

यंदाच्या ऑलिम्पिकपूर्वी नीरजचे सोशल मीडियावर 1 लाख 43 हजार फॉलोअर्स होते. मात्र, त्याने सुवर्ण जिंकले आणि काही दिवसातच इन्स्टाग्रामवर नीरजचे फॉलोअर्स 34 लाखांवर पोहोचले.

Related Stories

दहशतवादी हल्ल्यानं सोमालिया पुन्हा हादरलं; दोन बॉम्ब स्फोटात १०० ठार

Archana Banage

सूर्याची चमक, भारताचा सहज विजय

Amit Kulkarni

भारत-ऑस्ट्रेलिया शेवटची वनडे आज

Patil_p

मुष्टियोद्धा डिंग्को सिंगला उपचारासाठी दिल्लीत आणणार

Patil_p

शिंदे गटाला सरकार पाडण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं; संजय राऊतांचा हल्लाबोल

Archana Banage

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता जनतेशी साधणार संवाद

prashant_c
error: Content is protected !!