Tarun Bharat

नीरज चोप्रा खेलरत्नसाठी नामांकित

दुती चंद, अर्पिंदर सिंग, मनजित सिंग यांची अर्जुनसाठी शिफारस

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली असल्याचे जाहीर केले.या पुरस्कारासाठी एएफआय चोप्राची शिफारस करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याला बुधवारी पुष्टी देण्यात आली. याशिवाय महिला धावपटू दुती चंदला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. तिच्यासह तिहेरी उडीपटू अर्पिंदर सिंग, 800 मी. धावपटू मनजित सिंग व मध्यम पल्ल्याची धावपटू पीयू चित्रा यांचीही या पुरस्कारासाठी एएआयने शिफारस केली आहे. चोप्राची खेलरत्नसाठी सलग तिसऱयांदा शिफारस झाली आहे. त्याला 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. प्रमुख साहायक प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तर माजी थाळीफेकपटू कुलदीप सिंग भुल्लर, माजी धावपटू जिन्सी फिलिप यांची ध्यान चंद जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे

Related Stories

. के.श्रीकांत दुसऱया फेरीत

Omkar B

स्पेनचा हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये दाखल

Patil_p

सिंधूच्या विनंतीला साईची मान्यता

Patil_p

गुजरात जायंट्सकडून यु मुम्बा पराभूत

Patil_p

थायलंडमधील टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या ऐश्वर्याची बाजी

Archana Banage

धोनीला हवी होती आणखी एकदा नाणेफेक : संगकारा

Patil_p