Tarun Bharat

नीरव मोदीच्या कोठडीत 6 ऑगस्टपर्यंत वाढ

ऑनलाईन टीम / लंडन : 

बँक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लंडनमध्ये अटकेत असलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत 6ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला. 

नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेचे 14 हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झाला होता. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. तो  सध्या लंडनमधील वन्डस्वर्थ कारागृहात बंद आहे. मागील महिन्यात लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीला 9 जुलैपर्यंत कोठडी देण्याचा आदेश दिला होता. मात्र, काल झालेल्या सुनावणीत ब्रिटनच्या न्यायालयाने त्याच्या कोठडीत 6 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. 

नीरव विरोधात भारतात प्रत्यार्पण करण्याचा खटलाही सुरू आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयासमोर त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते. त्याच्या प्रत्यार्पणाशीशी संबंधित खटल्याच्या दुसऱ्या सत्राची सुनावणी सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. 

Related Stories

365 दिवस भरपगारी सुटी !

Patil_p

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी पेटवली ट्रेन; एका युट्युबरसह ४०० जणांविरोधात FIR दाखल

Archana Banage

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 887 वर, 20 जणांचा मृत्यू

tarunbharat

मुसळधार पावसामुळे लष्करी छावणीची भिंत कोसळून ९ ठार, दोघे जखमी

Archana Banage

चीन, चिनी कम्युनिस्ट पार्टी हा आशियाला धोका

Patil_p

“पूर्वी संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या, सध्याची परिस्थिती वाईट” – सरन्यायाधीश

Archana Banage
error: Content is protected !!