Tarun Bharat

नीलेश काब्राल यांची उमेदवारी दाखल

प्रतिनिधी /केपे

कुडचडे मतदारसंघातील भाजप उमेदवार व विद्यमान आमदार तसेच वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेला विकास फक्त भाजपच पुढे नेऊ शकतो आणि यासाठी परत एकदा भाजप सत्तेवर येणे गरजेचे आहे. मागच्या दीड वर्षात राज्यात कोविड परिस्थितीमुळे कामाची गती मंदावली तसेच संसाधनांच्या कमतरतेमुळे प्रगती थांबली, असे काब्राल म्हणाले. त्यांच्याबरोबर कुडचडे-काकोडा नगराध्यक्ष विश्वास सावंत, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ देसाई, उपनगराध्यक्षा रुचा वस्त, नगरसेवक प्रमोद नाईक, प्रसन्ना भेंडे, शेल्डेचे सरपंच कायतान लिमा तसेच पंच, असोल्डा पंचायतीचे पंच, कार्यकर्ते आणि समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

थिवी मतदारसंघात कोविड लसीकरणास उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

गोमासे मंडळ पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Amit Kulkarni

मयडे देवी सातेरी देवस्थानचा 15 रोजी वर्धापनदिन

Amit Kulkarni

न्यू मार्केटात विनोद शिरोडकर यांच्याकडून मनमानी कारभार

Omkar B

वास्कोतील राजस्थान ग्रमीण मेळ्य़ाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

सिकेटी फुटबॉल मैदानाचे आज होणार उद्घाटन;5 कोटींचा प्रकल्प

Amit Kulkarni