Tarun Bharat

नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने आज फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दीपक भागवत यांनी हा निर्णय दिला.

पीएमसी घोटाळय़ातील मुख्य आरोपी राकेश वाधवान आणि सोमय्या पिता-पुत्र व्यवसायात पार्टनर आहेत. निकॉन इंन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी सोमय्या यांची आहे. त्यांचा वसईत प्रकल्प असून, पीएमसी घोटाळ्यातील आरोपांखाली सोमय्या पिता-पुत्रांना अटक करण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. तसेच या प्रकल्पातील घोटाळय़ांची कागदपत्रे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेनंतर नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामळे नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Stories

नेपाळच्या रेडिओवर भारतविरोधी भाषणे अन् गाणी

datta jadhav

शोपियां चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

धैर्यशील मानेंना लोक धडा शिकवतील

datta jadhav

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

Rohan_P

एक रुपया टाका अन् शुद्ध पाणी घ्या…

Patil_p

एसटी संप : दापोली तब्बल 18 कर्मचारी निलंबित

Sumit Tambekar
error: Content is protected !!