Tarun Bharat

नुकसानभरपाईचे धनादेश वठले नाहीत

मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

महापुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना आणि शेतकऱयांना नुकसानभरपाईचे धनादेश देण्यात आले होते. मात्र, ते धनादेश वठले नाहीत. त्यामुळे अजूनही त्या गरीब जनतेला नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही. तरी तातडीने त्या सर्वांना रक्कम द्यावी, अशी मागणी रयत संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

सर्किट हाऊस येथे मुख्यमंत्री आले असता रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गोकाक तालुक्मयातील शेतकऱयांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना निवेदन दिले. बिरनगड्डी (ता. गोकाक) येथील 100 हून अधिक जणांना नुकसानभरपाईचे धनादेश देण्यात आले होते. मात्र हे धनादेश वठलेच नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. मात्र अजूनही रक्कम देण्यात आली नाही. तरी तातडीने गोकाक तहसीलदार आणि तलाठय़ांना सांगून नुकसानग्रस्तांना रक्कम द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष चुनाप्पा पुजेरी, जावेद मुल्ला यांच्यासह शेतकरी व बिरनगड्डी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.. 

Related Stories

कर्नाटक पोस्ट विभागात 2 हजार 443 जागांसाठी भरती

Omkar B

मंगळवारी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडीत

Patil_p

नुकसानग्रस्तांना प्रतिगुंठा 68 रुपये साहाय्यधन मिळणार!

Amit Kulkarni

अरगन तलावनजीक नियमबाहय़ वाहनधारकांवर पोलीसांची कारवाई

Patil_p

निपाणीच्या लोकरे यांना पाठ्यावृत्ती पुरस्कार

Omkar B

मृतदेहापासून संसर्गबाधेचा धोका नाही !

Patil_p