Tarun Bharat

नुसरतच्या ‘छोरी’चा टीझर प्रदर्शित

अभिनेत्री नुसरत भरूचाचा आगामी चित्रपट ‘छोरी’चा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा हा टीझर सोशल मीडियावर शेअर करत नुसरतनेच याची माहिती दिली आहे. “डर आपका सबसे अच्छा नया दोस्त बनने वाला है’’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

नुसरत स्वतःच्या फर्स्ट लुकमध्ये गरोदर दिसून येत असून तिच्या चेहऱयावर भीती दर्शविण्यात आली आहे. पोस्टरमध्ये ती एका तलावानजीक दिसून येत असून पाण्यात तिच्यासह आणखीन तीन मुलांचे प्रतिबिंब दर्शविण्यात आले आहे. हा एक भयपट असून नुसरत या चित्रपटावरून अत्यंत उत्साही आहे.

हा चित्रपट 26 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. विशाल फ्यूरिया यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात मीता वशिष्ठ, राजेश जैस, सौरभ गोयल यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, विक्रम मल्होत्रा आणि जॅक डेव्हिस यांनी केली आहे.

Related Stories

आमिरसोबत काम करणार नागार्जुनचा पुत्र

Patil_p

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात NCB कडून रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप

Archana Banage

शाळेच्या सोनेरी आठवणींना उजाळा देणारा बॅक टू स्कूल

Patil_p

बडय़ा कलाकारांचा सोबत काम करण्यास नकार

Amit Kulkarni

लॉकडाउनमध्ये शिकले अनेक नव्या गोष्टी

Patil_p

हुमाचा नवा लुक पाहून चाहते पडले गोंधळात

Archana Banage