पुलाची शिरोली / वार्ताहर
नूर ए रसुल फौंडेशनने कोरोनाच्या काळातही सामाजीक बांधिलकी जपली आहे. असे मत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. ते हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील मदरसामध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, रुग्णांशी सलोख्याच नातं ठेवल्याने एक महिन्यात अडीचशेहुन अधिक रुग्णांना डिसचार्ज मिळाला आहे. कोरोना योद्धा म्हणुन काम केलेल्या डॉक्टरांनी ही जिवाची पर्वा न करता सेवा केली आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
कोल्हापुरातील डॉ . असिफ सौदागर यांनी नूर ए रसुल फौंडेशनच्या माध्यमातुन कोविड सेंटर सुरु केले आहे. एक महिन्यात सर्व जाती धर्माच्या २५३ रुग्णावर योग्य उपचार करुन डिसचार्ज देण्यात आला आहे. येथे ऑक्सिजन बेड सह १०० बेड उपलब्ध असुन तज्ञ डॉक्टरांची टिमही तैणात आहे. अल्प मोबदल्यात सेवा दिल्याने कोल्हापुरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातुन रुग्न उपचार घेत आहेत. बुधवारी या सेंटरला आरोग्य राज्यमंञी नाम. राजेद्र पाटील यड्रावकर यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी डॉ. सुजित मिणचेकर ,नूर रसुल फौंडेशनचे अध्यक्ष डाँ आसिफ सौदागर ,रहिद खान,यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. शकील महाबरी, डॉ. शब्बीर हजारी,डॉ. अमिर हजारी,डॉ नसिर हजारी,डॉ. सना हजारी यांना नाम. पाटील यांचे हस्ते कोविड योद्धा म्हणुन प्रमाणपञ देवुन सन्मान करण्यात आला.

