Tarun Bharat

नृसिंहवाडी दत्त देवस्थान कडून कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी पाच लाख

प्रतिनिधी / कुरुंदवाड

कोरोना विरुद्धच्या लढ्यात शासनाला सहकार्य देण्याच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी तालुका शिरोळ येथील दत्त देवस्थान मार्फत पाच लाख रुपये धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याकडे दत्त देव संस्थान चे अध्यक्ष अशोक पुजारी व सचिव गोपाल पुजारी यांनी सुपूर्द केला. मंत्री नामदार यड्रावकर यांनी दत्त देव संस्थान कार्यालयास याबाबत भेट दिली. यावेळी त्यांनी देवस्थान पदाधिकारी व विश्वस्त यांच्याशी कोरोना उपायोजना बाबत चर्चा केली.

यावेळी विश्वस्त विकास पुजारी प्राचार्य गुंडो श्रीपाद पुजारी डॉक्टर मुकुंद घाटे विवेक पुजारी अभिजीत जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली वैद्यकीय अधिकारी पी एस पाखरे यांनी त्यांना आरोग्य व याची माहिती दिली आरोग्य केंद्र सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री यड्रावकर यांनी दिली.

Related Stories

महाराष्ट्र : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

कोल्हापूर : काळम्मावाडी धरण क्षेत्रातील पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण करु : पालकमंत्री

Archana Banage

Ratnagiri : चिपळुणात डेंग्यूची साथ, शहरासह तालुक्यात सापडताहेत रूग्ण

Kalyani Amanagi

कोल्हापूर : कुंभोज आठवडी बाजार दिवशीचा वाहतुक प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Archana Banage

हे कोल्हापुर आहे…इथं दोस्ती सुद्धा देवाला हेवा वाटेल एवढ्या ताकदीने निभावतात

Archana Banage

महे गावातून 10 गाई व एक म्हैस चोरीस

Archana Banage