Tarun Bharat

नृसिंहवाडी मंदिर परिसरात बेकायदेशीर मासेमारी कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कुरुंदवाड / प्रतिनिधी

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वत्र लॉक डाउन व संचारबंदी चालू आहे. याला श्री क्षेत्र नृसिंहवाडी अपवाद नाही त्यामुळे शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी दर्शनासाठी बंद आहे. मंदिरा घाट सध्या शुकशुकाट आहे. याचा फायदा घेऊन मंदिराच्या समोरील बाजूस औरवाड हद्दीत नदीपलीकडील औरवाड गौरवाड गावातील अनेक मासेमारी करणारे सध्या मासेमारीसाठी जमत आहेत.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे धार्मिक क्षेत्र असल्यामुळे येथील नदीतील माशांना नैवेद्य अर्पण करणे, पिंड प्रदान करणे यामुळे येथील परिसरात माशांची पैदास मोठी आहे.याचाच फायदा घेऊन अनेक मासेमारी करणारे सध्या नदी पलीकडील हद्दीत तसेच नदीतून पोहत येऊन मंदिर परिसरात बेकायदेशीर मासेमारी करत आहेत.याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. तसेच मंदिरातील सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांना नदीतून शिवीगाळ करणे, रात्रीच्या वेळी देखील मासेमारी करणे असे प्रकार येथे घडत आहेत. या मासेमारांना प्रतिबंध होऊन मंदिर व परिसरातील मासेमारी बंद व्हावी अशी मागणी दत्त देवस्थान मार्फत होत आहे.

मासेमारी मुळे होणाऱ्या नदी प्रदूषण तसेच भाविकांना होणारा त्रास या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी औरवाड पूल ते संगम मंदिर घाट या परिसरात नदीच्या दोन्ही बाजूला मासेमारी करण्यासाठी बंदी आदेश जारी केला आहे मात्र नदीपलीकडील औरवाड गौरवाड गावातील काही हुल्लडबाज तरुणाकडून बंदी आदेश धुडकावून बेकायदेशीर मासेमारी केली जात आहे संबंधितावर कडक करावे करून योग्य ती शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांसह भाविका तून होऊ लागले आहे.

Related Stories

वाहतूक शाखेच्या पोलिसाचा सासूवर चाकू हल्ला

Patil_p

Kolhapur : बिबट्याकडून शाहूवाडीत गायीची शिकार

Abhijeet Khandekar

सातारा : बाधित-मुक्त आकड्यांची पाठशिवणी : 46 कोरोनामुक्त, 36 बाधित

Archana Banage

कराड ते काठमांडू सायकलस्वारांचे स्वागत

Patil_p

सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक पुन्हा कार्यान्वित

Patil_p

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शुभम, सृष्टीची सुवर्णपदकी कामगिरी

Archana Banage